आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआजघडीला देशाची लोकसंख्या १३० कोटी आहे. यापैकी फक्त ६ कोटी लोक आयकर भरतात. मोठी लोकसंख्या कर भरत नाही. आम्ही आमच्या पातळीवर तपासणी मोहीम राबवत सरकारला फसवणाऱ्यांवर पकड ठेवतो. यापुढे जाऊन अधिकाधिक लोकांना आयकर भरण्यास बाध्य करण्यासाठी तुमच्या मदतीची आवश्यकता आहे. दोन लाखांवरील एकरकमी रोख व्यवहार झाल्यास तत्काळ आम्हाला कळवा, असे आवाहन पुण्याचे आयकर विभागाच्या गुप्तचर व गुन्हे अन्वेषण शाखेचे संचालक राजीवकुमार यांनी केले.
आयकर विभाग आणि क्रेडाई यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी क्रेडाईच्या कार्यालयात केले होते. या वेळी ते बोलत होते. क्रेडाईचे अध्यक्ष नितीन बगडिया उपस्थित होते. डॉक्टर्स, बिल्डर्स, ज्वेलर्स, हॉटेल-बँक्वेट हॉल चालक, मोटार वाहन विक्रेते संघटनेचे पदाधिकारीही उपस्थित होते. राजीवकुमार म्हणाले, आर्थिक व्यवहार विवरणपत्र दाखल करणे अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा तुम्ही अडचणीत याल. आयकर निरीक्षक झुबेर अहमद यांनी सूत्रसंचालन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.