आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रोझोन मॉलमध्ये ख्रिसमसनिमित्त १६ डिसेंबरपासून जिंगल ऑफ जॉय उपक्रम सुरू झाला असून, यास ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. हा उपक्रम १ जानेवारी २०२३ पर्यंत चालणार आहे. या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. जो ग्राहक २९९९ रुपयांची खरेदी प्रोझोनमध्ये करेल त्याला बम्पर प्राइजेस दिली जातील. तसेच १६ डिसेंबर ते १ जानेवारी या काळात प्रत्येक दिवशी सर्वोच्च खरेदी करणाऱ्या भाग्यवान ग्राहकास प्रोझोन मॉलतर्फे हमखास भेटवस्तू दिली जाईल.
या उपक्रमातील कार्यक्रम असे : शनिवारी क्विझ शोने प्रारंभ झालेला आहे. रविवारी (१८ डिसेंबर) ओपन माईक गाण्याचा कार्यक्रम असेल. तसेच जॉय ऑफ गिव्हिंग म्हणजे देण्यातील आनंद आणि ट्रेझर हंट हा कार्यक्रम २२ डिसेंबर रोजी असेल. किडी शेफ्स (लहानगे शेफ) यांचा कार्यक्रम २३ डिसेंबरला असेल. कॅरॉल सिंगिंगचा रंगतदार लोकप्रिय कार्यक्रम २४ डिसेंबरला राहील. २९ डिसेंबरला लिटिल चॅम्प कॉन्टेस्ट, तर मेल- फिमेल किड्स बेस्ट ड्रेस्ड कार्यक्रम ३० डिसेंबरला असेल. युवकांसाठीचा लाइव्ह रॉक बॅण्डचा कार्यक्रम २५डिसेंबर ते ३१ डिसेंबर-१ जानेवारी २०२३ या कालावधीत होईल. आनंद घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.