आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएस क्रिकेट ट्रॉफी:एनके संघाची कुंटे संघांवर 60 धावांनी मात; प्रदीप जगदाळे सामनावीर पुरस्काराचा मानकरी

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

झालानी टूल्स मैदानावर सुरू असलेल्या पीएस ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत एनके संघाने विजय मिळवला. सोमवारी झालेल्या सामन्यात एनके संघाने कुंटे स्पोर्ट्स संघावर 60 धावांनी मात केली. या सामन्यात प्रदीप जगदाळे सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना एनके संघाने 20 षटकांत 7 बाद 171 धावा उभारल्या. यात सलामीवीर आर्यन शेजूळने 15 व शुभम हरकळने 19 धावा काढल्या. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या योगेश चौधरीने सर्वाधिक 38 धावा काढल्या. त्याने 19 चेंडूंत 3 चौकार व 3 षटकार खेचले. अनुभवी फलंदाज अजय काळेने 11 चेंडूंत 2 चौकार व 1 षटकार लगावत 19 धावा केल्या. ऋषिकेश नायरने 13 व प्रदीप जगदाळेने 15 धावा काढल्या.

सराफ 9 धावांवर नाबाद

तळातील फलंदाज वसीम खानने 23 चेंडूंत 3 चौकार व 1 षटकार लगावत 32 धावा जोडल्या. सारंग सराफ 9 धावांवर नाबाद राहिला. कुंटेकडून गोपाल दाडने 21 धावांत 3 गडी बाद केले. रुकेश यादवने 2, अक्षय नरवडे व प्रज्वल घोडकेने प्रत्येकी 1-1 बळी घेतली.

प्रज्वलची अष्टपैलू खेळी व्यर्थ

प्रत्युत्तरात कुंटे संघ निर्धारित षटकांत 9 बाद 111 धावा करू शकला. यात संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर कार्तिक बाकलीवाल भोपळाही फोडू शकला नाही. संदीप सानप 3 धावांवर तंबूत परतला. दुसरा सलामीवीर अल्ताफ शेखने 14 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या यष्टीरक्षक फलंदाज प्रज्वल घोडकेने सर्वाधिक 40 धावांची खेळी केली.

प्रत्येकी दोन-दोन बळी

या खेळी त्याने 40 चेंडूंचा सामना करताना 3 चौकार व एक षटकार खेचला. जयेश कुंटेने 13 चेंडूंत तीन चौकार लगावत 16 धावा केल्या. तळातील फलंदाज राम 11 धावांवर नाबाद राहिला. इतर फलंदाजांनी निराशा केली. एनकेकडून प्रणवने अवघ्या 8 धावांत 3 गडी बाद केले. व्यंकटेश सोनवलकर व प्रदीप जगदाळेने प्रत्येकी दोन-दोन बळी घेतले. ऋषिकेश नायरने एकाला टिपले.

बातम्या आणखी आहेत...