आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएस क्रिकेट ट्रॉफी स्पर्धा:लकी क्लब, बेनिक्स स्पोर्ट्स संघ विजयी; वसीम शेख सामनावीर

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

झालानी टूल्स मैदानावर सुरू असलेल्या पीएस क्रिकेट ट्रॉफी स्पर्धेत वसीम शेखच्या (31 धावा, 2 बळी) अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर लकी क्लब संघाने शानदार विजय मिळवला. लकीने इथिकल संघाला 15 धावांनी पराभूत केले. या सामन्यात वसीम शेख सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना लकी क्लबने 19.4 षटकांत सर्व बाद 136 धावा उभारला. यात संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर मो. उमर अब्बास 7 धावांवर परतला. दुसरा सलामीवीर इम्रान पटेलने 19 चेंडूंत 4 चौकारांसह 23 धावा काढल्या. शाहरुख पठाणने 15, शेख अल्ताफने 10, परवेज खानने 13 धावा केल्या. अमन शेख भोपळाही फोडू शकला नाही. आठव्या क्रमांकावर आलेल्या वसीम शेखने सर्वाधिक नाबाद 31 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 28 चेंडूंत 2 चौकार व 2 षटकार खेचले. मो. वसीमने 13 धावा जोडल्या. इथिकलच्या रामेश्वर मतसागरने 22 धावा देत 3 गडी बाद केले. क्षितिज पाटीलने 2 आणि मोहित घाणेकर, धीरज बहुरे व सुरज मुरमुडेने प्रत्येकी एकाला टिपले.

अर्धशतकी सलामीनंतरही इथिकल पराभूत

प्रत्युत्तरात इथिकल संघाचा डाव 18.4 षटकांत 121 धावांवर संपुष्टात आला. यात सलामीवीर मुकूल जाजू व आकाश बोर्डे जोडीने 58 धावांची अर्धशतकी सलामी दिली. मुकूलने 19 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकार खेचत 32 धावा केल्या. आकाशने 23 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकार लगावत सर्वाधिक 33 धावा काढल्या. ऋषीकेश सपकाळने 21 आणि संतोष भारतीने 13 धावांचे योगदान दिले. लकीकडून मो. वसीमने 3.4 षटकांत 15 धावा देत 4 गडी बाद केला. वसीम शेख व इम्रान पटेलने प्रत्येकी दोन-दोन बळी घेतले.

नुरुलहकचे अर्धशतक, बेनिक्स विजयी

दुसऱ्या लढतीत बेनिक्स संघाने विजय मिळवला. बेनिक्सने एलिट क्रिकेट क्लबला 59 धावांनी पराभूत केले. प्रथम खेळताना सय्यद नुरुलहकच्या (51) अर्धशतकाच्या जोरावर बेनिक्सने 19.4 षटकांत सर्वबाद 135 धावा उभारल्या. प्रत्युत्तरात एलिट संघाचा डाव 16.1 षटकांत अवघ्या 76 धावांवर ढेपाळला. सय्यद आरेफने 3 गडी बाद केले.

बातम्या आणखी आहेत...