आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएस क्रिकेट ट्रॉफी:प्रदीप स्पोर्ट्स एसजीएसवर मात, मधुश जोशी सामनावीर

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

झालानी टुल्स मैदानावर सुरू असलेल्या पीएस क्रिकेट ट्रॉफीमध्ये प्रदीप स्पोर्टस संघाने विजय मिळवला. प्रदीपने सचिन घायाळ शुगर संघावर (एसजीएस) 4 गड्यांनी मात केली. या सामन्यात मधुश जाेशी सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना एसजीएस संघाचा डाव 18.5 षटकांत 123 धावांवर ढेपाळला. यात सलामीवीर अभिजित भगतने 17 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकार खेचत सर्वाधिक 35 धावा ठोकल्या. धीरज थोरातने 14 चेंडूंत 18 धावा केल्या. प्रतिक 11 धावांवर परतला.

मधली फळी पूर्णपणे अपयशी ठरली. सुमित मगरे (5), रिशी अगरहार (8) व अनिकेत जाधव (2) मोठी खेळी करू शकले नाहीत. त्यानंतर असलेल्या सचिन शिरसाटने 18 चेंडूंत 1 चौकारासह 17 धावा केल्या. आकाश लोखंडेने 16 चेंडूत 1 चौकार व 1 षटकार लगावत 18 धावा जोडल्या.

अनिल थोरे 1 धावेवर नाबाद राहिला. प्रदीपकडून मधुश जोशीने 4 षटकांत 17 धावा देत 4 फलंदाज तंबूत पाठवले. सलीम पठाण, मनोज ताजी व पांडुरंग गाजेने प्रत्येकी दोन-दाेन गडी बाद केले.

ओम, हरिओम चमकले

प्रत्युत्तरात प्रदिप स्पोर्ट्स संघाने एक चेंडू राखत 19.5 षटकांत 6 गडी गमावत विजयी लक्ष्य गाठले. संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर प्रणव के. अवघ्या एका धावेवर परतला. दुसरा सलामीवीर ओम जाधवने संघाचा डाव सावरला. ओमने सचिन सोबत दुसऱ्या गड्यासाठी 49 धावांची भागीदारी केली. ओमने 44 चेंडूंत 6 चौकार खेचत सर्वाधिक 43 धावांची खेळी केली. सचिनने 32 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 27 धावा केल्या. आर्यन गोजे 6 धावा करु शकला. हरिओम काळेने 28 चेंडूंचा सामना करताना 2 चौकार व 1 षटकार मारत 33 धावांचे योगदान दिले. पांडुरंग गाजे 7 धावांवर धावबाद झाला. एसजीएसकडून अनिल थोरेने 23 धावांत 2 आणि रिशी अगरहारने 21 धावा देत 2 गडी बाद केले. बळीराम तुपेने एकाला टिपले.

बातम्या आणखी आहेत...