आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएस क्रिकेट ट्रॉफी स्पर्धा:सचिन लव्हेरा, अविनाश मुकेची शतकी भागीदारी; प्रदिप स्पोर्ट्स संघ विजयी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

झालानी टूल्स मैदानावर सुरू असलेल्या पीएस क्रिकेट ट्रॉफी स्पर्धेत सचिन लव्हेरा (67) व अविनाश मुके (66) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर प्रदिप स्पोर्ट्स संघाने शानदार विजय साकारला. प्रदिपने शिवाय लॉयल संघाला 12 धावांनी पराभूत केले. या सामन्यात अविनाश मुके सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना प्रदिपने 20 षटकांत 9 बाद 170 धावांचा डोंगर उभारला. यात संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर प्रितेश भोपळाही फोडू शकला नाही. त्यानंतर आलेल्या सचिन लव्हेरा व सलामीवीर अविनाश मुकेने संघाचा डाव सावरत अवघ्या 65 चेंडूंत 123 धावांची शतकी भागीदारी केली. सचिनने 45 चेंडूंत 9 सणसणीत चौकार व 2 षटकार खेचत 67 धावा ठोकल्या. अविनाशने 31 चेंडूचा सामना करताना 4 चौकार व 6 उत्तुंग षटकार लगावत 66 धावांची अर्धशतकी खेळी केली. प्रणव के . याने 13 धावा जोडल्या. संघ 200 धावांचा आकडा सहज गाठेल असे वाटत असताना त्यानंतर आलेल्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. पांडुरंग गाजे (3), आर्यन गोजे (7), हरिओम काळे (1), अर्जुन राजपूत (2), सलीम पठाण (0 ) हे झटपट बाद झाले.

शिवायकडून राजू पारचक्केने 23 धावांत 3 व अनिकेत काळेने 26 धावांत 3 गडी बाद केले. लिखित कासलीवालने 2 व चैतन्य जाधवने 1 बळी घेतला.

शिवायच्या 158 धावा :

प्रत्युत्तरात शिवाय लाँयल संघ निर्धारित षटकांत 9 बाद 158 धावा करु शकला. यात विश्वजित राजपूतने सर्वाधिक 47 धावा काढल्या. या खेळीत त्याने 24 चेंडूंत 3 चौकार व 4 षटकार मारले. सलामीवीर प्रितेश चार्ल्सने 19 व अभिषेक दापकेने 12 धावा केल्या. देवेन शर्माने 20 धावा काढल्या. जी. सचिन 2 चैतन्य जाधव 0 आल्यापावली परतले. लिखित कासलीवालने संघर्ष केला. त्याने 19 चेंडूंत 2 चौकारांसह 25 धावांचे योगदान दिले. अंबादास हाके 18 धावांवर नाबाद राहिला.

प्रदिपकडुन हरिओम काळेने 29 धावांत 2 आणि मनोज ताजीने 34 धावांत 2 गडी बाद केले. सलीम पठाण, आर्यन गोजे व पांडुरंग गाजे यांनी प्रत्येकी एक-एक गडी टिपला.

बातम्या आणखी आहेत...