आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएस क्रिकेट ट्रॉफी:यंग इलेव्हन संघाचा विजय; लकी क्रिकेट क्लबला हरवले, सलामीवीर ऋषिकेशचे 12 चेंडूंत 4 चौकार

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

झालानी टूल्स मैदानावर सुरू असलेल्या पीएस ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेमध्ये यंग इलेव्हन संघाने 49 धावांनी विजय मिळवला. शनिवारी झालेल्या लढतीत लकी क्रिकेट क्लबला हरवले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना यंग इलेव्हनने 20 षटकांत 8 बाद 153 धावा उभारल्या. यात सलामीवीर ऋषिकेश तरडेने 12 चेंडूंत 4 चौकार एक षटकार लगावला.

दुसरा सलामीवीर मधुर पटेल 30 चेंडूंत 4 चौकार एक षटकार मारत 31 धावा काढल्या. अमित पाठकने 13 आणि स्वप्निल चव्हाण 27 केल्या. अष्टपैलू स्वप्नीलने 26 चेंडू 3 चौकार लगावले. मधल्या फळीतील युवा खेळाडू राहुल शर्माने सर्वाधिक 35 धावा ठोकल्या. या खेळीत त्याने 24 चेंडूंत 2 चौकार 2 षटकार मारले.

लकी संघ ढेपाळला

तळातील फलंदाज विशेष काही करू शकले नाहीत. ते एकेरी धावसंख्येवर परतले. लकी संघाकडून अमन शेख व इम्रान पटेलने प्रत्येकी दोन-दोन गडी बाद केले. मोहम्मद वसीमने 30 धावा देत 3 फलंदाज तंबूत पाठवले. वसीम शेखने एकाला टिपले. अष्टपैलू स्वप्नील पुढे लकी संघ ढेपाळला. प्रत्युत्तरात लकी संघाचा डाव 16.2 षटकांत अवघ्या 104 धावांवर संपुष्टात आला.

20 चेंडूचा सामना

यंग इलेव्हनच्या स्वप्निल चव्हाणने त्यांचे 4 गडी बाद करत दबाव निर्माण केला. संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर इमरान अहमद अवघ्या 8 धावांवर परतला. दुसरा सलामीवीर इमरान पटेलने 29 चेंडूंत चार चौकारांसह 23 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या शाहरुख पठाणने 20 चेंडूचा सामना करताना 4 चौकार खेचत सर्वाधिक 24 धावा केल्या. त्याचा अडथळा स्वतःच्या गोलंदाजीवर झेल घेत स्वप्नील चव्हाण दूर केला.

मधल्या फळीतील अली चाऊसने 14 धावा जोडल्या. इतर फलंदाजांनी निराशा केली. शेख अल्ताफ (1), अमन शेख (5), खालेद कादरी (7), लईक अन्सारी (6), मो. वसिम (7), वसिम शेख (5) हे तळातील फलंदाज अपयशी ठरले. यंगच्या स्वप्नील चव्हाणने 18 धावा देत 4 गडी बाद केले. प्रविण क्षिरसागरने 6 धावांत 2 बळी घेतले. अमित पाठक, संदिप सहानी, शुभम मोहिते यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला.

बातम्या आणखी आहेत...