आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएस क्रिकेट ट्रॉफी स्पर्धा:एसजीएसची शिवायवर 29 धावांनी मात, चैतन्य जाधव सामनावीर

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

झालानी टुल्स मैदानावर सुरू असलेल्या पीएस क्रिकेट ट्रॉफीमध्ये एसजीएस संघाने विजय मिळवला. शनिवारी झालेल्या सामन्यात एसजीएसने शिवाय लॉयल संघावर 29 धावांनी मात केली. सामन्यात चैतन्य जाधव-पाटील सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना एसजीएस संघ 16.4 षटकांत अवघ्या 110 धावांवर ढेपाळला. यात संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर धीरज थोरात 3 धावांवर परतला. प्रतिक भाेपळाही फोडू शकला नाही. सुमीत मगरे 8 आणि अनिकेत जाधव 4 धावांवर परतले. सलामीवीर अभिजीत भागतने सर्वाधिक 41 धावांची खेळी केली. यात त्याने 21 चेंडूंचा सामना करताना 6 चौकार आणि 2 षटकार लगावले. श्रीने अभिषेक दापकेच्या हाती त्याला झेल बाद करत अडथळा दुर केला. सहाव्या क्रमांकावर आलेल्या सचिन शिरसाटने 19 चेंडूंत २ चौकारांसह 16 धावा काढल्या. ऋषी अग्रहारने 22 चेंडूंत 1 चौकार मारत 15 धावा जोडल्या. आकाश लोखंडे शुन्यावर परतला. गणेश मते 1 धावावर नाबाद राहिला. शिवायकडून श्रीने 39 धावा देत 3 गडी बाद केले. चैतन्य जाधवने 17 धावांत 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. दिपक कासलीवालने 2 बळी घेतले. नीलेश सेवेकर व अभिषेक दापकेने प्रत्येकी एकाला टिपले.

शिवाय संघ अवघ्या 80 धावांवर ढेपाळला :

प्रत्युत्तरात शिवाय लॉयल संघाचा डाव अवघ्या 80 धावांत संपुष्टात आला. एसजीएसने दिलेले माफक आव्हानही त्यांना गाठता आले नाही. त्यांची आघाडीची फळी अपयशी ठरली. सलामीवीर अशोक शिंदे भोपळाही फोडू शकला नाही. विक्रांत व श्री प्रत्येकी 1-1 धावांवर परतले. अष्टपैलू चैतन्य जाधवने 21 चेंडूंत 3 चौकार लगावत 19 धावा काढल्या. जी. सचिनने सर्वाधिक 33 धावा केल्या. त्याने 35 चेंडूंत 4 सणसणीत चौकार मारले. जयेश वैष्णवने 21 चेंडूंत 2 चौकारांच्या मदतीने 21 धावांचे योगदान दिले. एसजीएसकडून आकाश लोखंडने 2.5 षटकांत केवळ 6 धावा देत 4 गडी बाद केले. अनिल थोरे व बळीराम तुपेने प्रत्येकी 2-2 आणि अनिकेत जाधव व ऋषी अग्रहारने प्रत्येकी 1-1 बळी घेतले.

बातम्या आणखी आहेत...