आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएस क्रिकेट ट्रॉफी:यंग इलेव्हन संघाची लाँयल संघावर 5 गड्यांनी मात; चैतन्य जाधवची हॅट्रिक

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

झालानी टूल्स मैदानावर सुरू असलेल्या पीएस क्रिकेट ट्रॉफी स्पर्धेत यंग इलेव्हन संघाने विजय मिळवला. शुक्रवारी झालेल्या सामन्यात यंगने शिवाय लाँयल संघावर 5 गड्यांनी मात केली. या सामन्यात गोलंदाज संदिप सहानी सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना शिवाय लाँयलचा डाव 19.3 षटकांत127 धावांवर संपुष्टात आला. प्रितेश चार्ल्स व अभिषेक दापके जोडीने 51 धावांची सलामी दिली. प्रितेशने 17 चेंडूंत 4 चौकार व 1 षटकार खेचत 25 धावा केल्या. अभिषेकने 25 चेंडूंत 5 चौकारांसह 23 धावा काढल्या. विश्वजित राजपूत (18), लिखित कासलीवाल (14) हे स्वस्तात परतले. त्यानंतर आलेल्या अंकित काळेने फटकेबाजी करत 15 चेंडूंत 2 षटकारांसह 23 धावा ठोकल्या. गौरव खाडे (1), जयेश वैष्णव (6), अंबादास हाके (4), जी. सचिन (4) हे विशेष काही करु शकले नाहीत. यंग इलेव्हनच्या संदिप सहानीने 4 षटकात 28 धावा देत 4 फलंदाज तंबाखू पाठवले. सय्यद अब्दुल वाहेदने 22 धावांत 3 आणि कर्णधार स्वप्नील चव्हाणने 14 धावांत 2 गडी बाद केले.

अमित पाठकचे अर्धशतक

प्रत्युत्तरात यंग इलेव्हनने 16.2 षटकांत 5 गडी गमावत 128 धावा करत विजय साकारला. यात संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर स्वप्नील खडसे भोपळाही फोडू शकला नाही. सलामीवीर ऋषिकेश तरडेने 24 चेंडूंत 16 धावा केल्या.

तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या अनुभव फलंदाज अमित पाठकने शानदार अर्धशतकी खेळी केली. या खेळीत त्याने 343 चेंडूचा सामना करताना 8 सणसणीत चौकार व 5 उत्तुंग षटकार खेचत 72 धावा ठोकल्या. गोलंदाजी 2 बळी घेत चांगली कामगिरी करणाऱ्या कर्णधार स्वप्नील चव्हाणने 32 धावांची विजयी खेळी केली. त्याने 25 चेंडूंत 2 चौकार व 2 षटकार लगावले. मधुर पटेल ल नितीन फुलाने शुन्यावर बाद झाले. शुभम मोहिते 3 धावांवर नाबाद राहिला.

चैतन्यची स्पर्धेतील पहिली हॅट्रिक

शिवाय लाँयलच्या चैतन्य जाधवने स्पर्धेतील पहिली हॅट्रिक घेतली. चैतन्यने 4 षटकांत 22 धावा देत 4 गडी बाद केले. त्याने सलग तीन चेंडूवर अमित, नितीन व मधुरला बाद केले. राजू पारचक्केने एकाला बाद केले.

बातम्या आणखी आहेत...