आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मरण दिन:परिवहन कार्यालयातर्फे रस्ते वाहतुकीबद्दल जनजागृती

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

“प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे २० नोव्हेंबर रोजी जगामध्ये रस्ते अपघातात जीव गमावलेल्या व्यक्तींचा स्मरण दिनानिमित्त रस्ते वाहतुकीबद्दल जनजागृती करण्यात आली.

या अंतर्गत दुपारी मध्यवर्ती बसस्थानक, सिडको बसस्थानक आदी ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये सुरक्षित वाहने चालवण्यासंदर्भात वाहनधारकांना माहिती देण्यात आली. प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मैत्रेवार व सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी रमेशचंद्र खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन निरीक्षक संजय गांगोडे, सहायक मोटर वाहन निरीक्षक अर्जुन खिंडरे, नितीन राठोड, दारासिंग घुनावत, मकरंद जायभाये यांनी या उपक्रमासाठी सहकार्य केले. या वेळी अपघातात जीव गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...