आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:शैक्षणिक कागदपत्रांसाठी 10 जूनपर्यंत जनजागृती ; झोपडपट्टी भागातील लोकांशी संवाद

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आयुष्यात शिक्षणाची पहिली पायरी म्हणजेच पहिला वर्ग. वर्गात प्रवेश घेण्यासाठी काही कागदपत्रांची गरज भासते. कधी नावात तर कधी प्रवेश घेताना चुका झाल्यास भविष्यात अडचणीचे ठरते. त्यामुळे पहिल्यांदा प्रवेश घेण्यापूर्वी कागदपत्रे काढून त्याची तपासणी करा. यासाठी रीड अँड लीड फाउंडेशनतर्फे मशीद, स्लम (झोपडपट्टी) भागात शैक्षणिक कागदपत्रांबाबत एक जूनपासून जनजागृती केली जात आहे. ही मोहीम १० जूनपर्यंत चालणार आहे. मोहिमेचे आयोजक अब्दुल कय्युम नदवी म्हणाले की, शैक्षणिक जीवनात प्रवेश करताना विविध कागदपत्रांची गरज भासत असते. त्यासोबतच शाळेत नाव टाकताना जन्म दाखला मागवला जातो. त्यानुसार मुला-मुलीला प्रवेश दिला जातो. सदरील दाखल्यावर योग्य नाव टाकणेसुद्धा महत्त्वाचे असून जर नाव चुकीचे पडल्यास दुरुस्तीसाठी अनेक खेटे घालावे लागतात. न्यायालयापर्यंत सुद्धा जावे लागते. त्यामुळे शाळा, कॉलेज सुरू होण्यापूर्वी शैक्षणिक कागदपत्रे काढून त्यावरील नाव, आधार कार्डावरील नाव, त्यावरील स्पेलिंग बरोबर आहे की नाही याची तपासणी करायला पाहिजे. जन्म, रहिवासी, उत्पन्न दाखला, बोनाफाइड आदी प्रमाणपत्र काढून घेतले पाहिजे. यासाठी जागतिक पालक दिनापासून फाउंडेशनने औरंगाबादेतील मशिदींमधून पालकांसाठी शैक्षणिक जनजागृती अभियानाला सुरुवात केली. यात ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन, मारियन मिर्झा मोहल्लाचे सहकार्य मिळत आहे.

फाउंडेशनच्या वतीने १० जूनपर्यंत शहरातील मशिदींमध्ये मौलानांमार्फत जनजागृती केली जात आहे. त्याचप्रमाणे मिसारवाडी, जटवाडा, नारेगाव, सहिदा कॉलनी, बेरी बाग, पडेगाव, हिनानगर या भागांत कॉर्नर मीटिंग घेऊन महिला, मुला-मुलींची शैक्षणिक कागदपत्रे काढण्यावर मार्गदर्शन करणार आहे. सध्या सेतू सुविधा केंद्रात कागदपत्रे काढण्यासाठी गर्दी नाही. दहावी-बारावी निकालानंतर गर्दी होऊ शकते. यासाठी आता कागदपत्रे जमा केली पाहिजेत असे अध्यक्ष मिर्झा अब्दुल कय्युम नदवी यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...