आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:जनता कर्फ्यु झाला, कारवाई झाली पण शहाणपण येत नसल्याने चक्क यमराजाच्या सजीव देखाव्यातून जागृती, आखाडा बाळापूरात उपक्रम

हिंगोली3 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेला समजावून सांगितले, जनता कर्फ्यु झाला, दंडात्मक कारवाई झाली, मात्र त्यानंतरही लोकांना शहाणपण येत नसल्याने मंगळवारी (ता. ८) चक्क यमराजाचा सजीव देखावा तयार करून शहरामध्ये कोरोनाबाबत जनजागृत केली. ‘तुम्ही जागरूक रहा नाह तर मी आलोच’ अशा शब्दात गावकऱ्यांमध्ये जनजागृत करण्यात आली आहे.

आखाडा बाळापूर येथे कोरोना बाधित रुग्णांची संख्या मागील काही दिवसांत वाढली आहे. कोरोनामुळे यापुर्वी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या शिवाय परिसरातील काही गावांमधून रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे. त्यानंतरही गावकऱ्यांमधून कुठल्याही प्रकारची काळजी घेतली जात नव्हती. विशेष म्हणजे गावात ग्रामपंचायत व व्यापाऱ्यांच्या मदतीने जनता कर्फ्यु पाळण्यात आला. मात्र त्यानंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली. तर आखाडा बाळापूर पोलिसांनी वाहनांवर तसेच विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरु केली. त्यानंतरही नागरीकांमधून कुठल्याही प्रकारची काळजी घेतली जात नसल्याचे दररोजच्या व्यवहारावरून दिसून येऊ लागले होते.

त्यामुळे नागरीकांना सामाजिक अंतर, प्रतिबंधात्मक उपाय योजना याची माहिती देण्यासाठी चक्क यमराजाचा सजीव देखावाच तयार करण्याचा निर्णय उपसरपंच विजय बोंढारे यांनी घेतला. त्यानुसार चित्रकला शिक्षक दिलीप दारव्हेकर यांच्या मदतीने यमराजाचा देखावा तयार करून रेड्यावरून यमराजाची फेरी मारण्यात आली. नागरीकांनी तोंडाला मास्क लावल्या शिवाय घराबाहेर पडू नये, व्यापाऱ्यांनी त्यांचे काऊंटर वेळोवेळी साफ करावे, सॅनेटायझरचा वापर करावा, मास्क नसलेल्या ग्राहकांना वस्तू देऊ नये असे आवाहन करण्यात आले. एवढेच नव्हे तर ‘तुम्ही काळजी घ्या अन्यथा मी आलोच’ असे स्लोगन तयार करून गावातून फेरी मारत जनजागृती करण्यात आली आहे. या उपक्रमाची चांगलीच चर्चा सुरु आहे.

नागरीकांनी काळजी घ्यावी ः विजय बोंढारे, उपसरपंच, ग्रामपंचायत आखाडा बाळापूर

कोरोना बाबत ग्रामपंचायतकडून वेळोवेळी जनजागृती करण्यात आली. मात्र त्यानंतरही नागरीकांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ लागले. रुग्णांच्या वाढत्या संख्येनंतरही नागरीकांवर परिणाम होत नव्हता. त्यामुळे यमराजाचा सजीव देखावा तयार केला आहे. आता तरी नागरीकांनी काळजी घेतली पाहिजे.