आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CM शिंदे उद्या औरंगाबाद दौऱ्यावर:वैजापूर, सिल्लोडमध्ये जाहीर सभा; आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर देणार?

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी (ता. 30) व रविवारी (ता. 31) औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. शनिवारी वैजापूर येथे सायंकाळी साडे सहा वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे. तर, रविवारी सकाळी 11.30 वाजता औरंगाबादेत एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेला संबोधित करतील. त्यानंतर अब्दुल सत्तार यांचा मतदार संघ असलेल्या सिल्लोडमध्ये शिंदे विविध विकास कामांचे भूमिपुजन व उद्घाटन करणार आहेत.

रविवारी दुपारी पावणे तीनच्या दरम्यान एकनाथ शिंदे यांची सिल्लोडमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेतच अर्जुन खोतकर अधिकृतरित्या शिंदे गटात प्रवेश करतील, अशी चर्चा आहे. दरम्यान, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी नुकताच औरंगाबाद जिल्ह्याचा दौरा करुन बंडखोरांवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर मुख्यमंत्रीदेखील राज्याच्या दौऱ्यावर आहेत. उद्या आणि परवाच्या सभेत मुख्यमंत्री शिंदे काय बोलणार, आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर देणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

शिंदेंचा दौरा कार्यक्रम

  • शनिवार

दुपारी 3 वाजता - मालेगाव येथून मोटारीने वैजापूर जाणार.

सायंकाळी 6 वाजता - शासकीय विश्रामगृह, वैजापूर येथे आगमन

सायंकाळी 6.30 वा. - वैजापूरमधील महालगाव येथे शिवसेना पक्षाची जाहीर सभा. त्यानंतर औरंगाबादला येणार

  • रविवार

सकाळी 10 ते 11.30 वा. - विभागीय आयुक्त कार्यालयात पाऊस, अतिवृष्टी, पिक-पाणी व विकास कामांबाबत आढावा घेणार.

सकाळी 11.30 वा. ते 12.00 वा. - पत्रकार परिषद

दुपारी 12.30 वा. - औरंगाबाद येथून मोटारीने सिल्लोडकडे प्रयाण.

दुपारी 1.30 ते 02.15 वा. - सिल्लोड येथे बाळासाहेब ठाकरे उद्यान लोकार्पण सोहळा

दुपारी 2.30 ते 02.45- 1) नगरपालिका इमारतीचे भुमीपूजन 2) छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण. 3) प्रवेश द्वाराचे लोकार्पण. 4) नॅशनल सहकारी सुतगिरणी भूमीपूजन.

2.45 ते 04.15 - सिल्लोडमधील नगर परिषदेच्या मैदानात जाहीर सभा.

दुपारी 4.15 वा. - सिल्लोड येथून मोटारीने औरंगाबादकडे येणार.

सायंकाळी 6.00 वा. ते 06.15 - हर्सुल नाका येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन.

सायंकाळी 7.00 ते 07.15 - 1) छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यास अभिवादन, औरंगाबाद. 2) अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन 3) भडकल गेट येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन.

रात्री 8.15 - 1) क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास अभिवादन 2) शीख समाजाच्या गुरूद्वारास भेट

रात्री 8.15 ते 9.15 - आमदार श्री.संजय शिरसाठ यांच्या कार्यालयात आगमन व राखीव.

रात्री 9.15 - गारखेडा स्टेडिअम मार्गे आमदार संदीपान भुमरे यांच्या कार्यालयाकडे प्रयाण.

रात्री 9.30 ते 09.45 - आमदार संदीपान भुमरे यांच्या कार्यालयात आगमन व राखीव.

रात्री 9.45 वा. - आमदार श्री.अतुल सावे यांच्या कार्यालयाकडे प्रयाण.

रात्री 10.10 वा - आमदार श्री.अतुल सावे यांच्या कार्यालयात आगमन व राखीव.

रात्री 11.00 वा. - औरंगाबाद विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.

बातम्या आणखी आहेत...