आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संमेलन:अण्णा भाऊ साठे संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन शहरात ३ व ४ डिसेंबरदरम्यान तापडिया नाट्यगृह येथे होणार आहे. या संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन विजय राऊत, प्रदीप सोळुंके, चेतन राऊत, के. ई. हरिदास यांच्या हस्ते करण्यात आले. डिझायनर रवींद्र खैरनार यांनी हे बोधचिन्ह साकारले आहे. संमेलन स्थळांना शायर बशर नवाज सभागृह, दिवंगत कवी सतीश काळसेकर ग्रंथदालन, गोविंद पानसरे विचार मंच अशी नावे देण्यात येणार आहे. संमेलनाचा खर्च लोकवर्गणीतून उभारण्यात येणार आहे. या वेळी स्वागताध्यक्ष डॉ. सुधाकर शेंडगे, संयोजन समिती अध्यक्ष डॉ. शेख इक्बाल मिन्ने, सचिव समाधान इंगळे, कार्यालयीन सचिव डॉ. मच्छिंद्र गोर्डे, अश्फाक सलामी, अभय टाकसाळ उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...