आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाणिज्य परिषद:अखिल भारतीय वाणिज्य परिषदेच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखा व एमजीएम विद्यापीठातर्फे २२ ते २४ डिसेंबरदरम्यान अखिल भारतीय वाणिज्य परिषदेचे आयोजन केले आहे. परिषदेत जवळपास एक हजार संशोधन पेपर सादर केले जाणार आहेत. अडीच हजारपर्यंत सभासद हजर राहणार आहेत. देशभरातील १५ ते २० कुलगरू सहभागी होणार आहेत. यासाठी डॉ. जयश्री सूर्यवंशी, प्रा. सय्यद अझरुद्दीन, प्राचार्य किशोर साळवे, प्रा.फराह गौरी, प्रा. भारती गवळी, डॉ. जितेंद्र अहिरराव यांच्या अध्यक्षतेत वेगवेगळ्या समित्यांचे गठन करण्यात आले आहे. परिषदेच्या माहितीपुस्तिकेचे शुक्रवारी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. परिषदेचे सचिव प्रा. डॉ. वाल्मीक सरवदे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवाय माहिती वेबसाइट व स्वतंत्र अॅप तयार करण्यात आले आहे. याप्रसंगी प्राचार्य नंदकुमार राठी, डॉ. राजेश लहाने, डॉ. संदीप गायकवाड, डॉ. मनोज पगारे, डॉ. फारूक खान, डॉ. गणेश काथार उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...