आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात शनिवारी (१७ डिसेंबर) पर्यटन क्षेत्राचे पहिले गीत मराठी आणि हिंदी भाषेत प्रकाशित होणार आहे. यासाठी पुढाकार घेतलेली पर्यटन कंपनी स्मिता हाॅलिडेज, सध्याचे आघाडीचे संगीतकार अविनाश आणि विश्वजित तसेच तरुणाईचा आवडता गायक रोहित राऊत यांनी मिळून हे अप्रतिम गाणे तयार केले आहे. मराठीमध्ये “चल बघू सारी दुनिया ही नवी, ना पाहिले कधी ते’ आणि हिंदीमध्ये “चल चले नीले आसमाँ के तले, सैर दुनिया की कर ले’ असे या पर्यटन गीताचे शब्द आहेत. हे गीत सर्वांना मंत्रमुग्ध करेल, असा विश्वास स्मिता हाॅलिडेजचे संचालक जयंत गोरे यांनी व्यक्त केला.
प्रवासाचा उत्साह वाढविणाऱ्या आणि मनाला प्रफुल्लित करून ठेका धरायला लावणाऱ्या या गाण्याचे प्रकाशन शनिवारी प्रोझोन मॉलमधील आयनाॅक्स थिएटर स्क्रीन-२ येथे संध्याकाळी ७ वाजता होणार आहे. या वेळी संगीतकार अविनाश-विश्वजीत, तसेच विविध क्षेत्रांतील नामवंत मंडळी, पर्यटनप्रेमी उपस्थित असतील. या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्मिता हाॅलिडेजचे मुख्य सीएमडी जयंत गोरे, स्मिता गोरे, प्रज्ञा गोरे, पार्टनर विवेक मोहरीर, चॅनल पार्टनर किरण देशपांडे यांनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.