आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरात्र विशेष:रोडरोमिओंना प्रसाद देऊन अद्दल घडवणारी पूजा

औरंगाबाद / रोशनी शिंपी13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

“ती’ गप्प बसते म्हणून “त्या’ची छेडण्याची हिंमत वाढते. “तो’ छेडतो म्हणून “ती’ अधिकच घाबरून जाते आणि मुकी होते. ही चुप्पी तोडण्यासाठी खूप ताकद लागते. एकदा ती तोडली की पुढला प्रवास सोपा असतो. ही हिंमत दाखवली औरंगाबादच्या पूजाने. भीतीपोटी छेडछाड सहन करणाऱ्या अनेकींसाठी ती आता प्रेरणा ठरली.

रस्त्यावरच्या छेडछाडीमुळे तरुणींनी आत्महत्या केल्याचीही उदाहरणे कमी नाहीत. खरं तर गुन्हा तो करतो, शिक्षा मात्र ती भोगते. मुलींना, महिलांना संरक्षण देणारे कायदे असले तरी भीतीमुळे ती त्याचा उपयोग करून घेताना दिसत नाही. पूजा पाटील मात्र याला अपवाद ठरली. २६ जूनला तिने एका छेडणाऱ्याला भररस्त्यात चोप दिला. लहान भावाला क्लाससाठी घेऊन जाणाऱ्या चुलत बहिणीचा दोघेजण पाठलाग करीत होते. अश्लील कमेंट्स करीत होते. घाबरलेल्या बहिणीने पूजाला फोन करून मदत मागितली. पूजाही तत्काळ घटनास्थळी पोहोचली. तिने छेडणाऱ्यांना जाब विचारायला सुरुवात केली. त्यांनी पूजालाही अश्लील बोलण्यास सुरुवात केली. ते आक्रमकही झाले होते. पण ती घाबरली नाही, उलट त्यांना फटकवायला सुरुवात केली. त्यातील एकाला चांगलेच रस्त्यात लोळवले तेव्हा दुसरा घाबरून पळून देला. दोघीच बहिणी असल्याने पूजाच्या पालकांनी तिला खंबीरपणे वाढवल्याने हे बळ आल्याचे ती सांगते. तिच्या या धैर्यामुळे छेडणाऱ्यांविरोधात आवाज उठवण्याची ताकद अनेकींना मिळाली आहे. त्यामुळेच आतापर्यंत अजून दोघींनी ही हिंमत दाखवत रोडरोमिओंना धडा शिकवला आहे.

बलात्कार, कौटुंबिक हिंसाचार, अॅसिड हल्ला यासारख्या घटना घडल्या की सारे पेटून उठतात. मात्र, या गंभीर गुन्ह्यांची सुरुवात छेडछाडीसारख्या किरकोळ वाटणाऱ्या आणि दुर्लक्षिल्या जाणाऱ्या गुन्ह्यांपासून होत असते. त्यामुळे त्याच पातळीवर गुन्हेगारांना रोखले तर पुढील गंभीर प्रकार करण्यास ते धजावत नाही. मात्र त्यात आड येते मुलींची भीती. पूजा पाटील हिने नेमकी त्यावरच मात करण्याची प्रेरणा दिली आहे. जोवर आपण आपल्यासाठी उभे राहणार नाही, तोवर कुणीही आपल्याला या परिस्थितीतून सोडवू शकणार नाही, याचा परिपाठ तिने घालून दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...