आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील रस्ते विकासाच्या संदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली. शहरातील चिकलठाणा ते वाळूज ओव्हर ब्रिज संदर्भात तत्काळ डीपीआर बनवण्यात आला असून त्याचे प्रेझेंटेशन यावेळी दाखवण्यात आले.
औरंगाबाद ते पुणे केवळ 2 तासांत
मध्यंतरी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी औरंगाबाद ते पुणे या नवीन महामार्गाची घोषणा केली होती .त्या संदर्भात राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी यांना औरंगाबाद-पुणे या नवीन रस्ते मार्गाचा डीपीआर तत्काळ पूर्ण करण्यासंदर्भात या बैठकीत निर्देश दिले आहे. औरंगाबाद ते पुणे हा महामार्ग दोन्ही शहरांच्या औद्योगिक विकासांना पूरक राहणार आहे. औद्योगिक आणि सांस्कृतिक राजधानी या नवीन महामार्गाने जोडण्यात येणार आहे. हा महामार्ग दोन्ही शहराच्या सामाजिक आणि आर्थिक विकासामध्ये महत्त्वपूर्ण भर घालणारा आहे. केवळ दोन तासात पुणे पर्यंतचे अंतर पूर्ण करण्यात येणार आहे. सर्व महामार्गाची कामे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्याकडून पूर्ण करण्यात येणार आहे.
चिकलठाणा-वाळूज उड्डाणपूल लवकर पूर्ण करू
संसद भवनाच्या परिसरामध्ये ग्रंथालयामध्ये झालेल्या या आढावा बैठकीस महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदार उपस्थित होते. औरंगाबादमधून केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, लोकसभेचे खासदार इम्तियाज जलीलदेखील उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील विविध रस्ते विकासाच्या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लवकरात लवकर कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे. औरंगाबाद शहरातील चिकलठाणा ते वाळूज उड्डाणपुलाच्या कामाच्या संदर्भातदेखील आढावा बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून त्याचे डिटेल प्रेझेंटेशन नितीन गडकरी यांनी बघितले आणि हा उड्डाणपूल लवकरात लवकर पूर्ण करू, असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी दिले.
औरंगाबाद ते पैठण या महामार्गाचे टेंडर अंतिम टप्प्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. शहरवासीयांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या आणि सातत्याने वाहतुकीची कोंडी होत असलेल्या नगर नाका, माळीवाडा, दौलताबाद टी पॉइंट ते दौलताबाद महामार्ग चार पदरी करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा बैठकीत करण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.