आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवनवीन वैद्यकीय ज्ञान डॉक्टरांपर्यंत पोहचणे आवश्यक:कृत्रिम श्वासोश्वास यंत्रणेवर आयोजित कार्यशाळेचा समारोप

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैद्यकीय क्षेत्रातील नव नविन उपचार पध्दती, तंत्रज्ञान, संशोधन याची माहिती केवळ वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. यामुळे रुग्णांवर अधिकप्रभावी आणि योग्य प्रकारे उपचार तर होतीलअसे मत इंडियन सोसायटी ऑफ क्रिटीकल केअर मेडिसीन (आयएससीसीएम) औरंगाबाद शाखेच्यावतीने कृत्रिम श्वासोश्वास यंत्रणेवर आयोजित कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी तज्ज्ञांनी मांडले.

कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवस अतिशय महत्वपूर्ण ठरला. दुबई येथून आलेले डॉ. प्रशांत नासा यांनी व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णाला देण्यात येणाऱ्या औषधींविषयी विस्तृत मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे डॉ . नासा औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत.

रुग्णाला व्हेन्टीलेटर

ह्रदय आणि फुफुसाच्या व्हेन्टीलेशनमधील संबंध, कृत्रिम आणि नैसर्गिक श्वासोश्वास यांची सांगड कशी घालायची, ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले तर ते कसे वाढवायचे दम्याच्या रुग्णाला व्हेन्टीलेटर कसे द्यायचे अशा विविध विषयांवर सकाळच्या सत्रात कपिल झिरपे, सुभाल दिक्षीत, संजय धानुका, कपील बोरावके, प्रशांत नासा आदी डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. प्रात्यक्षिकांच्या सत्रात डॉ. सहस्त्रबुध्दे आणि डॉ. धनराज जगतकर यांचे सत्र अतिशय महत्वाचे ठरलेल्या लंग अल्ट्रासाऊंड अर्थात सोनोग्राफी यंत्राचा वापर करुन ह्रदय आणि फुफुसाचे सांचे संचलन समजावून घेणे आणि या निरीक्षणांच्या माध्यमातून रुग्णाला लवकरात लवकर बरे करणे कसे शक्य आहे यावर त्यांनी विस्तृत मार्गदर्शन केले.

तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन

डॉ. शरद बिरादर नहुश पटेल, अविनाश त्रिभूवन, अमोल कुलकर्णी, कपिल बोरावके, खालीद खातीब आदी राष्ट्रीयस्तरावरील तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. जागेच्या अभावी अनेकांना या कार्यशाळेत प्रवेश देता आला नाही. लवकरच अशाच प्रकारची कार्यशाळा पुन्हा आयोजित करण्यात येईल असे संयोजकांनी यावेळी सांगितले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत सहस्त्रबुध्दे, सचिव डॉ. शरद बिरादर, डॉ. योगेश लक्कस ,डॉ. धनंजय खटावकर, गितेश दळवी, आशिष कुंडलवाल, अनिकेत चाटे, अजिंक्य देशमुख, उमेश गवळी,राहूल चौधरी, डॉ.सुधिर देशपांडे, डॉ. प्रशांत वळसे,अमोल कुलकर्णी, अविनाश त्रिभूवन, विनोद गोसावी, नहुश पटेल, योगेश देवगिरीकर आदी संयोजन समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...