आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा:पुणे, मुंबई, ठाणे, सांगली, उस्मानाबाद संघांची उपउपांत्यपूर्व फेरीत धडक, औरंगाबाद विजयी

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली येथे आयोजित ५८ व्या पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व संघ निवड चाचणी स्पर्धेत दुसऱ्या दिवशी महिला गटात सांगलीने नाशिकचा चुरशीच्या सामन्यात पराभव केला. पुरुष गटात पुणे, मुंबई, ठाणे, उपनगर, उस्मानाबाद, रत्नागिरी या संघांनी विजय मिळवत उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. रामलिला मैदानात सुरू असलेल्या सामन्यात महिला गटात औरंगाबादने सिंधुदुर्गचा ४ गुणांनी (११-७) असा पराभव करत उपउपांत्यपूर्व फेरी गाठली.

मुलांच्या गटात औरंगाबादने जळगावचा १४-१२ असा १ डाव २ गुणांनी पराभव केला. औरंगाबादच्या अस्मित गावीत (२ मि. संरक्षण), आकाश खोजे (२.१० मि. संरक्षण व २ गुण) यांनी संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. जळगावतर्फे स्वप्नील चौधरीने (२.१० मि. संरक्षण) चमकदार कामगिरी केली. दुसरीकडे, मुंबई उपनगरने रत्नागिरीचा एक डाव ११ गुणांनी पराभव केला. उपनगरतर्फे ओमकार सोनावणे (२.३० मि. संरक्षण), ॠषिकेश मुर्चावडे (२.३० मि. संरक्षण व १ गुण), अनिकेत पोटे (१.४० मि. संरक्षण व ३ गुण) असा उत्कृष्ट कामगिरी केली. रत्नागिरीतर्फे निखिल सनगले (१ मि. संरक्षण) चांगला खेळ केला.

वैभवी, संजना, मानसी चमकल्या

महिला गटातील सांगली विरुध्द नाशिक हा सामना वगळता अन्य बहूतांश सामने एकतर्फी झाले. महिला गटामध्ये मुंबईने लातूरचा ११-६ असा एक डाव ५ गुणांनी पराभव केला. मुंबईतर्फे संजना कुडव (३.१० मि. संरक्षण व ४ गुण), श्रेया नाईक (३.३० मि. संरक्षण), मयुरी लोटणकर (२.२० मि. संरक्षण), रिध्दी कबीर (२.३० मि. संरक्षण व ३ गुण) असा खेळ केला. तर लातूरतर्फे वैभवी शिंदे (१.२० मि. संरक्षण) चमकली. दुसऱ्या लढतीत ठाण्याने धुळ्याचा १ डाव ८ गुणांनी (१५-७) असा पराभव केला. विजयी संघातर्फे साधना गायकवाड (२.५० मि. संरक्षण), शितल भोर (२.४० मि. संरक्षण व १ गुण), कल्याणी कनक (५ गुण) चांगला खेळ केला. तर धुळ्यातर्फे मानसी पाटील (१, १.२० मि. संरक्षण) हिने एकटीने संघर्ष केला.

इतर सामन्यांचे निकाल

पुरुष गटात इतर सामन्यात नंदुरबारने लातूरचा १ डाव १ गुण (१०-९), ठाण्याने सिंधुदुर्गचा १ डाव १२ गुणांनी (२१-९), अहमदनगरने नंदुरबारचा १ डाव २ गुणांनी (११-९), पालघरने नांदेडचा १० गुणांनी (१९-९), सांगलीने साताऱ्याचा १ डाव ५ गुणांनी (१६-११) पराभव करत उपउपांत्यपूर्व फेरीच्या दिशेने वाटचाल केली.

दुसरीकडे महिला गटात रत्नागिरीने पालघरचा १ डाव १० गुणांनी (१६-६), मुंबईने साताऱ्याचा १ गुण आणि ८ मिनिटे राखून (११-१०), सोलापूरने अहमदनगरचा १ डाव ५ गुणांनी (१२-७), पुण्याने रायगडचा १ डाव १२ (१८-६) असा पराभव करत उपउपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.

बातम्या आणखी आहेत...