आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढोल-ताशांचा जथ्था सज्ज:पुणेरी ढाेल, विविध बीट्सवर बाप्पांचे स्वागत ; मुली-महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

औरंगाबाद / गिरीश काळेकर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या दाेन वर्षांनंतर गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. शहरातील ढोल पथकांची जय्यत तयारी सुरू आहे. मोरया...मोरया, अग्निपथ, गणेश आरती, पुणेरी ढोलसह विविध बीट्सवर ढोल-ताशांचा गजरात बुधवारी गणरायाचे स्वागत करण्यात येणार आहे. ढोल पथकांची महिनाभरापासून तयारी सुरू आहे. विविध पथकांनी ढोल खरेदी केले, काहींनी जुने ढोल दुरुस्त केले. पथकातील स्पर्धेत उत्तम चाली, भक्तिगीते आणि बीट्स बसवून ते सज्ज झाले आहेत. विशेषत: महिला आणि मुलींची संख्याही पथकात मोठ्या प्रमाणात दिसू लागली आहे. विजय औताडे यांचे विजयपथ, पर्वत कसुरे यांचे तिसगाव पथक, पदमपुरा भागातील बारवाल यांचे पथक, बाळासाहेब गायकवाड यांचे पथक, हर हर महादेव, काका चौक, मामा चौक, श्री कलश क्रीडा मंडळ असे विविध ढोल पथक स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...