आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवीगाळ:कात्रीने भोसकून जखमी करणाऱ्यास 2 वर्षे शिक्षा

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तरुणाला शिवीगाळ करून कात्रीने भोसकून गंभीर जखमी करणारा आरोपी दीपक भिकाजी बोराडे (३१, रा. केऱ्हाळा, ता. सिल्लोड) याला दोन वर्षे सक्तमजुरी, पाच हजारांच्या दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एच. केळुसकर यांनी ठोठावली. योगेश दत्तू राऊत (२९, रा. केऱ्हाळा, ता. सिल्लोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार १५ मे २०११ रोजी सायंकाळी ते गावातील कृष्णा बोराडे यांच्या दुकानात कटिंग करण्यासाठी गेले होते. दुकानात त्यांच्या आधीच एका व्यक्तीची दाढी सुरू असल्याने फिर्यादी बाकड्यावर बसले. काही वेळाने दुकानात दीपक बोराडे आला. त्याने फिर्यादीला बाकड्यावर का बसला? तेथून ऊठ म्हणत शिवीगाळ सुरू केली. फिर्यादीने त्याला जाब विचारला. त्यामुळे चिडलेल्या आरोपीने टेबलावर पडलेली कात्री फिर्यादीच्या छातीखालील फासळीत भोसकून त्यास गंभीर जखमी केले. प्रकरणात सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

बातम्या आणखी आहेत...