आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपीला कोर्ट उठेपर्यंत शिक्षा; 6 हजारांचा दंडही:डॉक्टरला धमकावत रुग्णवाहिकेची फोडली होती काच अन् चालकाला शिवीगाळही

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद पीएचसीतील डॉक्टरला पाहुण घेण्‍याची धमकी देत पीएचसी बाहेर उभ्‍या अ‌ॅम्बुलन्‍सची काच फोडून चालाकाला शिवीगाळ केल्याप्रकरणी आरोपी काकासाहेब एकनाथ डफळ (३४, रा. आमठाणा ता. सिल्लोड) याला कोर्ट उठेपर्यंत शिक्षा आणि विविध कलमांखाली सहा हजारांचा दंड जिल्हा व सत्र न्‍यायाधीश व्‍ही.एस. कुलकर्णी यांनी ठोठावला.

प्रकरणात आमठाण (ता. सिल्लोड) येथील पी‍एचसीच्‍या तत्कालीन वैद्य‍किय अधिकारी विद्या आसाराम पवार (३४) यांनी फिर्याद दिली होती. त्‍यानूसार, २५ एप्रिल २०१५ रोजी फिर्यादी या कर्तव्‍यावर होत्‍या. मध्‍यरात्रीनंतर फिर्यादी या आपल्या कॉर्टरमध्‍ये असतांना पीएचसीतील सिस्‍टरने फोन करुन अपघाताचा रुग्ण आल्याचे सांगितले.

फिर्यादी पीएचसीत आल्या तेंव्‍हा रुग्ण गणेश शिंदे याच्‍यासह त्‍याच मित्र तथा आरोपी काकासाहेब डफळ तेथे आलेला होता. फिर्यादीने रुग्णावर प्राथमिक उपचार करुन रुग्णाच्‍या पायाला जास्‍त मार लागलेला असल्याने एक्सरे काढून पुढील उपचार सिल्लोड येथील सरकारी रुग्णालयात करण्‍यास सांगितले. त्‍यासाठी फिर्यादीने अ‌ॅम्बुलन्‍स चालक चंद्रशेखर चव्‍हाण यांना फोन करुन बोलावले. त्‍यावेळी आरोपी काकासाहेब डफळ याने तुम्ही गणेशवर येथेच उपचार करा, तुमची डीग्री काय कामाची, तुम्ही फक्त रेफर लेटर द्या, तुम्हाला उद्या सकाळी पाहुन घेतो असे म्हणत तुम्ही यापूढे काम कसे करता अशी धमकी दिली.

फिर्यादीने त्‍याला समजावून सांगितले, व त्‍या पुन्‍हा आपल्या कॉर्टरमध्‍ये गेल्या. त्‍यादरम्यान आरोपीने पीएचसी बाहेर अ‌ॅम्बुलन्‍सच्‍या पाठीमागील काच फोडून नुकसान केले तसेच अॅम्बुलन्‍स चालक चव्‍हाण यांना देखील शिवीगाळ केली. प्रकरणात सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला होता.

खटल्याच्‍या सुनावणीवेळी सहायक लोकाभियोक्ता उल्हास पवार यांनी पाच साक्षीदारांचे जबाब नोंदवले. दोन्ही बाजुंच्या युक्तीवादानंतर साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने आरोपी काकासाहेब डफळ याला दोषी ठरवून भादंवी कलम ३५३ आणि ४२७ अन्‍वये कोर्ट उठेपर्यंत शिक्षा तसेच प्रत्‍येकी तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून जमादार पठाण यांनी काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...