आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंकुमार्चन कार्यक्रम:श्री रेणुकामाता मंदिरात आज पूर्णाहुती, कुंकुमार्चन

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शाकंभरी पौर्णिमेनिमित्ताने ६ जानेवारीला बीड बायपाससह जळगाव रोडवरील श्री रेणुकामाता मंदिरात पूर्णाहुती तसेच कुंकुमार्चन कार्यक्रम होणार आहे. बीड बायपास येथील श्री रेणुकामाता मंदिरात सद्गुरू अप्पा महाराजांच्या अधिपत्याखाली अंबरीश महाराजांच्या मार्गदर्शनाखाली, अनिरुद्ध महाराजांच्या नियोजनानुसार ३० डिसेंबरपासून मंदिरात विविध कार्यक्रम सुरूआहेत.

शुक्रवारी शाकंभरी नवरात्र महोत्सवाची सांगता होणार आहे. या निमित्ताने सामूहिक जप, स्तोत्रपठण, पूर्णाहुती महाप्रसादाचे वाटप होणार आहे. जळगाव रोडवरील श्री रेणुकामाता मंदिरात शुक्रवारी पौर्णिमेनिमित्ताने कुंकुमार्चन कार्यक्रमात १५० महिला सहभागी होतील. दुपारी २ वाजेपासून कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. यात देवीच्या प्रतिमेला कुंकुमार्चन केले जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...