आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:औरंगाबादच्या सोहन यांनी साकारली ‘पुष्पा’ची मूर्ती; अल्लू अर्जुनला भेटण्याची मुलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी कलाकृती

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिणेतील सुपरस्टार अल्लू अर्जुनची प्रमुख भूमिका असलेला 'पुष्पा’ सिनेमा प्रचंड लोकप्रिय झाला आहे. अल्लूचे चाहते 'पुष्पा’मधील गाणी, संवाद, प्रसंग विविध रूपांत सोशल मीडियावर टाकत आहेत. औरंगाबादच्या सोहनकुमारने तर अल्लू अर्जुनचा पुतळा साकारला आहे.

लेबर कॉलनीतील रहिवासी सोहनकुमार फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंगचे काम करतात. त्यांची मुले ऱ्हिदम आणि मधुरम अल्लू अर्जुनचे चाहते आहेत. त्यांनाही अल्लूला भेटण्याची इच्छा आहे. ती पूर्ण करण्यासाठी सोहनकुमार यांनी शाडू मातीची अल्लूची हातात बंदूक घेतलेली मूर्ती १२ तासांत तयार केली. ती सहा इंच उंच आहे. १७ फेब्रुवारीला अल्लू अर्जुनचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्याला भेटून मूर्ती देणार असल्याचे सोहनकुमार यांनी सांगितले. ते म्हणाले की, पुष्पा सिनेमात दाखवल्याप्रमाणेच तयार केलेल्या मूर्तीवर नरेश महाले रंगकाम करणार आहेत. त्यानंतर ती काचेच्या पेटीत ठेवून आजूबाजूला गवत ठेवले जाणार आहे.

यापूर्वीही साकारल्या विविध मूर्ती
सोहनकुमार यांनी लॉकडाऊनच्या काळात मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून खडूपासून साईबाबा, श्री स्वामी समर्थ, मायकेल जॅक्सन, मीराबाई आदींच्या ५० पेक्षा अधिक मूर्ती साकारल्या आहेत.

अल्लूकडून होकार, साकारली मूर्ती
अल्लू अर्जुन यांच्याविषयी सोशल मीडियावर विविध प्रकारे प्रचार होत आहे. त्याचे अनुकरण न करता काहीतरी वेगळे करण्यासाठी मूर्ती तयार केली. अल्लू अर्जुन यांच्या सोशल मीडिया टीमने ती त्यांना दाखवली. त्यांच्याकडून होकार मिळाल्याने मी त्यांना मूर्ती देण्यासाठी मुलांना घेऊन १७ फेब्रुवारीला हैदराबादला जाणार आहे. -सोहनकुमार

बातम्या आणखी आहेत...