आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंडपीठात याचिका:विद्यापीठाच्या नावापुढे ‘भारतरत्न’ लावा ; औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या फलकाच्या नावापुढे भारतरत्न हा सन्मानजनक शब्द लावावा, या प्रमुख मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते नितीन माणिक बचके यांनी औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. याबाबत बचके यांनी विद्यापीठ प्रशासनाला वेळोवेळी निवेदने देत उपोषणही केले. मात्र, प्रत्यक्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावापुढे भारतरत्न लावलेले नाही. त्यामुळे नावापुढे भारतरत्न लावावे यासाठी बचके यांनी ॲड मधुकर बचके यांच्यामार्फत रिट याचिका दाखल केली आहे. भारतरत्न लावण्यासाठी कुलगुरूंना आदेश द्यावेत, अशी विनंती याचिकेत केली आहे. राज्य शासन आणि कुलगुरू यांना प्रतिवादी केले आहे. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. मधुकर परघने काम पाहत आहेत.

बातम्या आणखी आहेत...