आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याचिका दाखल‎:विद्यापीठाच्या नावापुढे‎ भारतरत्न लावा;‎ खंडपीठात याचिका दाखल‎

औरंगाबाद‎8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद‎ डॉ. बाबासाहेब आंबेडकर‎ मराठवाडा विद्यापीठाच्या‎ फलकाच्या नावापुढे भारतरत्न हा‎ सन्मानजनक शब्द लावावा, या‎ प्रमुख मागणीसाठी सामाजिक‎ कार्यकर्ते नितीन माणिक बचके यांनी‎ औरंगाबाद खंडपीठात जनहित‎ याचिका दाखल केली आहे.‎ याबाबत बचके यांनी कुलगुरू आणि‎ विद्यापीठ प्रशासनाला वेळोवेळी‎ निवेदने देत उपोषणही केले. मात्र,‎ प्रत्यक्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर‎ यांच्या नावापुढे भारतरत्न लावलेले‎ नाही.

त्यामुळे नावापुढे भारतरत्न‎ लावावे यासाठी बचके यांनी ॲड‎ मधुकर बचके यांच्यामार्फत रिट‎ याचिका दाखल केली आहे.‎ भारतरत्न लावण्यासाठी कुलगुरूंना‎ आदेश द्यावेत, अशी विनंती‎ याचिकेत केली आहे. राज्य शासन‎ आणि कुलगुरू यांना प्रतिवादी केले‎ आहे. याचिकाकर्त्यातर्फे ॲड.‎ मधुकर परघने काम पाहत आहेत

बातम्या आणखी आहेत...