आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माणुसकी:सर्व शिष्टाचार बाजूला ठेवत चक्कर येऊन पडलेल्या कॅमेरामनवर डॉ. कराड यांनी केले प्रथमोपचार

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी शिष्टाचार बाजूला ठेवत माणुसकी जिवंत असल्याचे दाखवून दिले आहे. ते दिल्ली येथे गुरुवारी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. दरम्यान, तिथे एक कॅमेरामन अचानक चक्कर येऊन पडला. हे पाहिल्यानंतर डॉ. कराड यांनी त्याच्यावर तत्काळ प्रथमोपचार केले.

एका खासगी दूरचित्रवाहिनीच्या कार्यक्रमासाठी डॉ. कराड यांना निमंत्रित केले होते. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी ते दिल्लीत स्थितीत स्टुडिओत गेले. कार्यक्रम सुरू होणार तितक्यात कार्यक्रमाचे चित्रण करणाऱ्या एक कॅमेरामनला अस्वस्थ वाटू लागले. चित्रीकरण सुरू असताना त्याला चक्कर आली आणि त्याच्या हातातील कॅमेरा सुटला. तो खाली पडला. कराड यांच्या हे लक्षात येताच सर्व शिष्टाचार बाजूला ठेवून डॉ. कराड धावतच त्या कॅमेरामनजवळ गेले. त्यांनी कॅमेरामनला जमिनीवर झोपवले आणि स्वतः गुडघ्यावर उभे राहत त्याचे पाय वर केले. त्याला खूप घाम आला होता. त्यांनी तत्काळ उपचार करून ग्लुकोजमिश्रित पाणी देण्यास सांगितले. काही वेळानंतर कॅमेरामन शुद्धीवर आला आणि नेहमीप्रमाणे कामाला लागला. यापूर्वी एकदा डॉ. कराड दिल्ली ते मुंबई असा विमानाने प्रवास करत असताना एका प्रवाशाच्या छातीत दुखत होते. त्याला त्रास होऊ लागला होता. चक्कर येऊन विमानात पडला तेव्हाही त्यांनी सर्व शिष्टाचार बाजूला ठेवत विमानातच त्याच्यावर प्रथमोपचार केले होते.

बातम्या आणखी आहेत...