आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भागवत कराडांमधला 'डॉक्टर' मदतीसाठी तत्पर:प्रोटोकॉल बाजूला ठेवत चक्कर येऊन पडलेल्या कॅमेरामनला दिला प्रथमोपचार

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड हे आपल्या साधेपणासाठी प्रसिद्ध आहेत. केंद्रात अर्थराज्यमंत्री एवढे मोठे पद असतानाही ते साधेपणा कधी सोडत नाहीत. शिष्टाचार बाजूला ठेवत प्रत्येकवेळी त्यांनी माणुसकी जिवंत ठेवली आहे. हे केवळ सांगण्यात पुरतेच नव्हे तर ते कृतीतून सिद्ध केले आहे . दिल्ली येथे गुरुवार 16 जून रोजी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात उपस्थित असताना तेथे चक्कर येऊन पडलेल्या कॅमेराम‌नला त्यांनी तात्काळ प्रथमोपचार केले.

एका खासगी दूरचित्रवाहिनीच्या कार्यक्रमासाठी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांना निमंत्रित केले होते. संबंधित कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी डॉक्टर कराड त्यांच्या दिल्लीत स्थितीत स्टुडिओत गेले. कार्यक्रम सुरू होणार तितक्यात कार्यक्रमाचे चित्रण करणारा एक कॅमेरामन यांना अस्वस्थ वाटू लागले. कार्यक्रमाचे चित्रीकरण सुरू असतानाच त्याला चक्कर आली आणि त्याच्या हातातील कॅमेरा सुटला आणि तो खाली पडला.

डॉक्टर कराड यांच्या संबंधित बाब लक्षात येताच त्यांनी सर्व शिष्टाचार बाजूला ठेवत धावत संबंधित कॅमेराम जवळ गेले. कराड यांनी कॅमेरामनला जमीनीवर झोपवले आणि स्वतः गुडघ्यावर उभे राहत त्याचे पाय वर केले. संबंधित कॅमेरामनला खूप घाम आलेला होता. त्यांनी तात्काळ त्याच्यावर प्रथमोपचार केले आणि ग्लुकोज मिश्रित पाणी देण्याची सांगितले. यापूर्वी अशा प्रकारचा त्रास झाला होता का अशी विचारणा देखील केली. काही वेळातच संबंधित कॅमेरामन हा शुद्धीवर आला आणि नेहमीप्रमाणे तो कामाला लागला.

विमानातच प्रथमोपचार

डॉक्टर कराड यांनी मात्र या प्रसंगामुळे सर्वांची मने जिंकून घेतली. मंत्री असून सुद्धा डॉक्टर कराड यांची वागणूक साधेपणाची असल्याबद्दल सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले. यापूर्वी एकदा डॉक्टर कराड दिल्ली ते मुंबई असा विमानाने प्रवास करत असताना एका प्रवाशाच्या छातीत दुखत असल्याने त्याला त्रास होऊ लागला होता आणि चक्कर येऊन विमानात पडला. तेव्हाही डॉक्टर कराड यांनी सर्व शिष्टाचार बाजूला ठेवत विमानातच त्याच्यावर प्रथमोपचार केले होते.

बातम्या आणखी आहेत...