आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी एक्स्पोज:पीडब्ल्यूडीने अंदाजपत्रके दिली नाही; 320 रुग्णालयांची ‘सुरक्षा’ रखडली

औरंगाबाद13 दिवसांपूर्वीलेखक: महेश जोशी
  • कॉपी लिंक
  • रुग्णालयांना अग्निशमन यंत्रणा बसवून ‘फायर एनओसी’ घेण्यात अडचणी

राज्यातील रुग्णालयांमध्ये सुरू असलेल्या जळीतकांडानंतर शासनाने सर्व रुग्णालयांचे फायर सेफ्टी अॉडिट करून त्यावर उपाययोजना करण्याचे आदेश दिले. या उपाययोजनांनुसार अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (पीडब्ल्यूडी) आहे. मात्र, रुग्णालये जळत असताना विभागाला याचे गांभीर्यच नाही. राज्यातील ३२० रुग्णालयांना पीडब्ल्यूडीने अंदाजपत्रके न दिल्याने आगीच्या संकटाशी दोन हात करण्यासाठीच्या उपाययोजना खोळंबल्याचे “दिव्य मराठी’च्या तपासात स्पष्ट झाले आहे.

राज्यात कोरोनाचे संकट गडद होत असताना रुग्णालयांना लागत असलेल्या आगींनी रुग्णांची चिंता वाढवली आहे. जानेवारीत भंडारा येथील जिल्हा रुग्णालयाच्या नवजात शिशू विभागास लागलेल्या आगीत १० नवजात बालकांचा बळी गेला. शुक्रवारी भांडूप येथील विजय वल्लभ रुग्णालयाच्या आगीत १४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. अशा घटना टाळण्यासाठी शासनाने १५ मार्च २०२१ रोजी राज्यातील सर्व रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांचे फायर सेफ्टी ऑडिट, इलेक्ट्रिक अॉडिट करणे तसेच रुग्णालयात आगीपासून बचावासाठी माॅक ड्रिल घेऊन फायर एनओसी घेण्याच्या सूचना पीडब्ल्यूडीला देण्यात आल्या होत्या. त्यानुसार पीडब्ल्यूडीने पीडब्ल्यूडीने ४७० रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांचे फायर सेफ्टी ऑडिट केले. ऑडिटमध्ये आढळलेल्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांसाठी लागणाऱ्या खर्चाचे अंदाजपत्रक पीडब्ल्यूडीने आरोग्य विभागाकडे सादर करणे अपेक्षित होते. परंतु ४७० पैकी ३२० रुग्णालयांना कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचे अंदाजपत्रक पीडब्ल्यूूडीने दिलेले नाही. यात ८ जिल्हा रुग्णालये (दोनशे खाटांची), ८ महिला रुग्णालये (दोनशे खाटांची), ३ सामान्य रुग्णालये (दोनशे खाटांची), शंभर खाटांची २० उपजिल्हा रुग्णालये, ५० खाटांची ३४ उपजिल्हा रुग्णालये आणि ३० खाटांच्या २४७ ग्रामीण रुग्णालयांचा समावेश आहे.

चार दिवसांची मुदत
नाशिकमध्ये अॉक्सिजन प्लँटमधील अपघातानंतर पीडब्ल्यूडी खडबडून जागी झाली. पीडब्ल्यूडीचे कार्यासन अधिकारी सुनील बागूल यांनी २२ एप्रिल रोजी एका पत्राद्वारे राज्यातील सर्व मुख्य आणि अधीक्षक अभियंत्यांना ४ दिवसांत अंदाजपत्रके सादर करण्याच्या सूचना केल्या. अंदाजपत्रके नसल्याने रुग्णालयांना अग्निशमन यंत्रणा बसवून ‘फायर एनओसी’ घेण्यात अडचणी येत आहेत. यामुळे अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधीनस्थ कार्यालयांना आवश्यक त्या कठोर सूचना देऊन शासनास अहवाल सादर करण्याचे पत्रात सांगण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...