आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्वचषक:कतारने तिसऱ्या जगाचे एक वेगळे चित्र सादर केले आहे

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कतार मध्ये झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाचा विजय झाला असला तरी मात्र जागतिक फुटबॉलमध्ये अद्यापही युरोपचे वर्चस्व कायम आहे. चार वर्षांत एकदा होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेतून जेवढा पैसा मिळतो त्यापेक्षा अधिक एकट्या इंग्लिश प्रीमियर लीगमधून दरवर्षी मिळतो. युरोपातील टॉपच्या लीगमध्ये खेळणारेच बहुतांश फुटबॉलपटू या विश्वचषकात खेळत होते. याशिवाय, फुटबॉलच्या लँडस्केपमध्ये काहीतरी बदल झाला आहे. युरोपमध्ये शेवटचा विश्वचषक खेळून १६ वर्षे झाली आहेत. यादरम्यान दक्षिण अाफ्रिका, ब्राझील, रशिया आणि कतरमध्ये विश्वचषक आयोजित करण्यात आले. २०१० मध्ये दक्षिण अाफ्रिकेत झालेल्या विश्वचषकाचा प्रचार ‘धिस टाइम फॉर अाफ्रिका’ या पद्धतीने करण्यात आला होता आणि घाना जवळपास उपांत्य फेरीत पोहोचल्यामुळे वाटले की ते सत्यच आहे. २०१४ ची विश्वचषक स्पर्धा ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लूला यांच्या यशाचे प्रदर्शन होते, तथापि शेवटी याच्या अगदी विपरित घडले. कतरमध्ये झालेला विश्वचषकही त्याच्या प्रतिष्ठेच्या प्रदर्शनासाठी होता. शरणार्थी कामगारांसोबत गैरवर्तन आणि एलजीबीटीक्यू अधिकारांबाबत असंवेदनशीलतेसाठी कतरवर कितीही टीका झाली असली तरी विश्वचषकाचे आयोजन करून कतरने ते सर्व प्राप्त केले आहे जे त्याला हवे हते. चार आठवड्यांपर्यंत सुरू असलेले फुटबॉल सामने आणि मैदानाबाहेरील घडामोडींमुळे आज जगभरात कतरची स्थिती आधीपेक्षा मजबूत झाली आहे. एखाद्य मुस्लिम बहुसंख्य असलेल्या, अरेबी भाषिक देशात इतकी मोठी स्पर्धा होण्याची ही पहिलीच वेळ होती. याचा उद्देश केवळ फुटबॉलचे आयोजन नव्हते. त्याची वेळ, होणारी गर्दी आणि त्या गर्दीतून येणाऱ्या कथानकांनी जगासमोर विश्वचषकासारख्या आयोजनांबाबत वेगळी बाजू समोर आणली आहे. याला ग्लोबल साऊथ म्हटले जाते, म्हणजे लॅटिन अमेरिका, अाफ्रिका आणि आशिया तील देश- त्यांची प्रचंड गुंतागुंत या आयोजनात दिसली. या अर्थाने हा आपल्या कालखंडाचा विश्वचषक होता. दक्षिण गोलार्धात थंडीच्या मोसमातही विश्वचषक होऊ शकतो, मात्र उत्तर गोलार्धात- विशेषत: यूरोपमध्ये नेहमीच उन्हाळ्यात होणारी ही स्पर्धा टीव्हीवर पाहणे हा एक वेगळा अनुभव होता. आखाती देशांतील जीवघेण्या उकाड्यातही स्पर्धा घेण्याची जोखीम फिफा पत्करू शकत नव्हती. त्यामुळे कतारच्या वातावरणानुसार फुटबॉलच्या कॅलेंडरची उलथापालथ करण्यात आली. जेव्हा युरोप थंडीने काकडत होता, त्यावेळी रोसारियोपासून रियाधच्या गल्ल्यांमध्ये नागरिकांची गर्दी झाली होती. दोहामध्ये तर स्टेडियमच्या आत आणि बाहेरही प्रचंड गर्दी झाली होती. यामुळेही एक जागतिक बदल अधोरेखित झाला. कतरने दूर देशातूनं आलेल्या पर्यटकांना भेटवस्तू दिल्या. कतरमध्ये झालेल्या विश्वषकात आतापर्यंतचे सर्वात वैविध्यपूर्ण प्रेक्षक उपस्थित होते. या प्रेक्षकांचा जोश, संगीत, उत्साह आणि ऊर्जेने या महोत्सवात प्राण फुंकले. कतारवासीयांचे शालीन पोशाख या उत्सवाचा अविभाज्य भाग होते. अरब आणि अाफ्रिकी अस्मितांचे गौरवास्पद प्रदर्शन झाले. ट्युनिशिया, सऊदी अरेबिया आणि मोरक्कोच्या विजयात हा गौरव झळकला. मोरक्को तर उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला आणि त्याचे सामने पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने आले. मोरक्को, इजिप्त, जॉर्डन, लेबनॉन येथील नागरिक कतरमध्ये मोठ्या संख्येनेे राहतात. भारतीयों आणि दक्षिण आशियायीही मोठ्या संख्येने दिसले. अर्जेंटिनाचे यश केरळ आणि ढाक्यातील प्रेक्षकांनी सर्वाधिक साजरे केले. पाश्चिमात्यांच्या टीकेनंतरही तिसऱ्या जगातील देशांनी या आयोजनाचे प्रसारण केले आणि ही सर्वात चांगले विश्वचषक आयोजन असल्याचेही सांगितले. अर्जेंटिनाच्या विजयाने लियोनेल मेस्सीला शीर्ष स्थानावर नेले असले तरी विश्वचषकातून आलेली सांस्कृतिक व सभ्यतेचा विचारही कमी महत्वाचा नाही. (‘द न्यूयॉर्क टाइम्स’ मधून)

डेव्हिड गोल्डब्लेट फुटबॉल इतिहासकार आणि द बॉल इज राउंड पुस्तकाचे लेखक

बातम्या आणखी आहेत...