आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणी कोरोना:पुण्याहून परतल्यानंतर क्वारंटाइन केलेल्या बालकाचा मृत्यू

परभणी2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • जिंतूर तालुक्यातील जोगवाडाची घटना

पूण्यातील भोसरी येथून जोगवाडा (ता.जिंतूर) येथे परतलेल्या एका कुटुंबातील क्वारंटाइन केलेल्या दोन वर्षीय बालकाचा मंगळवारी (दि.19) मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, ही घटना घडल्यानंतर चारठाणा येथील आरोग्य कर्मचार्‍यांची संपूर्ण टीम सोस-जोगवाडा येथे दाखल झाली असून क्वारंटाइन केलेल्या कुटुंबियांचे स्वॅब घेतले आहेत. या सर्वांचे स्लॅब पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांच्या अहवालाची प्रतिक्षा आहे.

मजुरीच्या निमित्ताने पुण्यात वास्तव्यास असणा-या भोसरी येथील एक कुटुंब 14 मे रोजी मोटारसायकलद्वारे गावी परतले. तेव्हा गावक-यांनी आक्षेप नोंदवल्या नंतर या कुटुंबास जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाइन करण्यात आले होते. दोन दिवस जिल्हा परिषद शाळेत राहिल्यानंतर त्या कुटुंबियांनी स्वतःघरी क्वारंटाइन होण्याची इच्छा दर्शविली. ते घरी परतले व घरीच क्वारंटाइन झाले. सोमवारी(दि.18) मे रोजी त्या कुटुंबातील लहान बालक(वय 2) याची प्रकृती चांगली नसल्याचे निदर्शनास आल्याबरोबर कुटुंबियांनी मुलास गावातील आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र जोगवाडा नेले. तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी प्रथम उपचार करून बालकाची प्रकृती गंभीर असल्याने जिंतूरला पुढील उपचारासाठी घेऊन जाण्यास सांगितले. कुटुंबियांनी धावपळ करीत तेथून त्या बालकाला जिंतूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्या डॉक्टरांनी बालकास मृत म्हणून घोषित केले.या घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...