आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा आयुक्त अन् माजी नगरसेवकांमध्ये खडाजंगी:एमआयएमच्या माजी नगरसेवकांचा अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांचे शहरातील लोकप्रतिनिधींसोबत अजूनही सूत जुळलेले नाही. यातच सोमवारी दि.19 डिसेंबर रोजीच्या रात्री प्रशासक आणि एमआयएमच्या माजी नगरसेवकांमध्ये जोरदार वादावादी झाली. डॉ. चौधरी यांच्याकडून वारंवार अपमानास्पद वागणूक मिळत असून, विकास कामे ठप्प झाल्या आरोप एमआयएमच्या माजी नगरसेवकांनी केला आहे. त्यामुळे आता प्रशासकाविरोधात जनआंदोलन छेडण्याची घोषणा एमआयएमने केली आहे.

जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी पालिकेच्या प्रशासकपदी असताना सर्वांशी सूत जुळवत पालिकेचा कारभार चालवला होता. विशेष म्हणजे 2022-23 या आर्थिक वर्षाच्या बजेटमध्ये त्यांनी प्रत्येक वॉर्डात 1 कोटी रुपयांची विकासकामे करण्याची घोषणा केली होती. मात्र त्यांच्या बदलीनंतर डॉ. चौधरी यांनी अनेक विकासकामांना ब्रेक दिला. 1 कोटींची कामे 60 लाखांवर आणली, ही कामेही आता होण्याची चिन्हे नसल्याने माजी नगरसेवक अस्वस्थ आहेत. रखडलेल्या विकासकामांसंदर्भात सोमवारी सायंकाळी एमआयएम पक्षाचे काही माजी नगरसेवक प्रशासक डॉ. चौधरी यांच्या भेटीसाठी पालिकेत पोहोचले. मात्र त्यांना बराच वेळ वेटींगमध्ये थांबवण्यात आले. त्यानंतर सर्वांना कक्षात प्रवेश दिला गेला. यातच खुर्च्या ओढून बसताना माजी नगरसेवक नासेर सिद्दीकी यांच्याकडून एक खुर्ची पडली. त्यावर डॉ. चौधरी यांनी अत्यंत रागाच्या भरात ही कोणती पद्धत, खुर्च्या पाडायची, असा टोला लगावला. यावेळी नगरसेवक आणि प्रशासक यांच्यात चांगलीच वादावादी झाली. या अपमानामुळे सिद्दीकी थेट कक्षातून बाहेर आले. थोड्या वेळाने अन्य नगरसेवकांनी त्यांची समजूत घालत त्यांना परत दालनात आणले. दहा मिनिटे विकासकामांवर खलबते झाले. तेव्हा कपात केलेला निधी नंतर देण्याचे आश्‍वासन डॉ. चौधरी यांनी दिले.

मी घरचे काम करीत नव्हतो!

वारंवार प्रशासकांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा आरोप एमआयएमच्या माजी नगरसेवकांतून केला जात आहे. पहिल्यांदा जेव्हा एमआयएमचे नगरसेवक प्रशासकांना भेटायला गेले तेव्हा डॉ. चौधरी यांनी तुम्ही माजी नगरसेवक आहात म्हणून डिवचले. दुसर्‍यांदा भेटायला गेल्यावर देखील शिष्टमंडळाला तासभर बाहेर ताटकळत ठेवले. कक्षात गेल्यावरही मी घरचे काम करीत नव्हतो, असा टोला मारला. त्यावर माजी नगरसेवकांनीही आम्हीसुद्धा आमचे घरचे काम घेवून आलेलो नाही, अशा शब्दात प्रशासक डॉ. चौधरी यांना सुनावले.

प्रशासकांविरोधात जनआंदोलनाचा इशाराशहरातील बुढ्ढीलेन, औरंगपुरा, चंपाचौक येथील रस्ते, ड्रेनेज आदी प्रलंबीत प्रश्‍नांसाठी आम्ही प्रशासकांकडे पाठपुरावा करत आहोत. मात्र ते अजिबात सहकार्य करत नाहीत. त्यामुळे आम्ही त्यांच्याविरोधात लवकरच जनआंदोलन करणार आहोत.नासेर सिद्दीकी, माजी नगरसेवक, एमआयएमचंपाचौक रस्तेकामात त्यांनी लक्ष घालावेमागील अनेक दिवसांपासून या चंपाचौक रस्त्याचे काम कंत्राटदाराने थांबवले आहे. या अधिक वर्दळीचा रस्ता असल्याने रोज नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासकांनी यात लक्ष घालून रस्त्याचे काम लवकर पूर्ण करायला हवे.फेरोज खान, माजी नगरसेवक एमआयएम.

बातम्या आणखी आहेत...