आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळा दाबला:जेवण करताना भांडण; मित्राने गळा दाबला ; केंब्रिज चौका जवळील घटना

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॉटेलमध्ये जेवण करत असताना मित्रांमध्ये अचानक झालेल्या भांडणाचा शेवट खुनाचा प्रयत्न करण्यापर्यंत गेल्याची घटना १५ जून रोजी रात्री १० वाजता केंब्रिज चौका जवळील पुलावर घडली. विकास अंकुश बल्लाळ (२०, रा. पिंपळगाव) व संतोष नारायण सकत (रा. नांदेड) यांच्यात वाद होऊन विकास गंभीर जखमी झाला. वरूड काझी फाटा चौकातील एका हॉटेलमध्ये विकास व संतोष काम करतात. या हॉटेलमध्येच त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर दोघेही बाहेर पडले.

जेवण करून पुन्हा वाद झाला व संतोषने विकासच्या डोक्यात दगडाने वार करून गंभीर जखमी केले. शिवाय, गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. स्थानिकांनी धाव घेतल्याने त्याचा जीव वाचला. याप्रकरणी १६ जून रोजी शुद्धीवर आल्यानंतर त्याच्या जबाबावरून चिकलठाणा पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...