आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन महिन्यांत चार दलितांवर अत्याचार:एकाही ठिकाणी मंत्री का पोहोचला नाही? आंबेडकरवादी संघर्ष समितीचा सवाल

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या दोन महिन्यांत दलितांवर अत्याचाराच्या चार घटना घडल्या. त्यापैकी एकाही अत्याचारित कुटुुंबाची विचारपूस करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री का पोहोचला नाही, असा सवाल आंबेडकरवादी अत्याचारविरोधी संघर्ष समितीने केला आहे. याप्रकरणी ९ सप्टेंबर रोजी निदर्शने, १० ऑक्टोबरला विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती दिनकर ओंकार, रमेशभाई खंडागळे गौतम खरात यांनी दिली.

पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, राज्यात सत्तांतर होताच हिंदुत्ववादी शक्ती प्रबळ झाल्या आहेत. त्यामुळे धुळे, हिंगोली तसेच पिसादेवी, खिर्डी (ता. औरंगाबाद) येथे दलितांवर अत्याचार झाले. या घटनानंतर सरकारचा प्रतिनिधी म्हणून एखाद्या मंत्र्याने घटनास्थळाची पाहणी, पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करणे, चौकशीचे आदेश देणे आवश्यक होते. ते झाले नाही म्हणून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. संतापाची भावना निर्माण होत आहे. या वेळी कृष्णा बनकर, गौतम लांडगे, किशोर थोरात, सय्यद तौफिक, विजय वाहूळ आदी उपस्थित होते.

ईदच्या शुभेच्छा देणार का?

शिंदे-फडणवीस खुशालपणे गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत हिंदुत्ववादी सरकार आल्याचे होर्डिंग्ज लावत आहेत. अशाच शुभेच्छा ते फुले-शाहू-आंबेडकर जयंती आणि विशेषत: ईदनिमित्त देणार का, असा सवाल मिलिंद दाभाडे यांनी उपस्थित केला.

बातम्या आणखी आहेत...