आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या औैरंगाबादसह मराठवाड्यातील रेल्वे प्रश्नांना दैनिक दिव्य मराठीने वेळाेवेळी वाचा फाेडली. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात या विभागावर कसा अन्याय झाला, याबाबतही सविस्तर वृत्त प्रकाशित केले हाेते. त्याचा संदर्भ देऊन अाैरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी साेमवारी लाेकसभेत हे प्रश्न उपस्थित केले. मराठवाड्यासारख्या मागास भागाला महाराष्ट्राचे लाेकप्रतिनिधी असलेल्या रेल्वेमंत्री पीयूष गाेयल यांनी न्याय द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
परभणी-मनमाड रेल्वेमार्ग अडीच टक्के फायद्यात असताना दुहेरीकरणाचे काम रेल्वे विभागाने स्थगित केल्याचे वृत्त दिव्य मराठीने १६ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रकाशित केले हाेते. तसेच मराठवाड्यातील अनेक मार्गांसह दौलताबाद-चाळीसगावही मार्ग रद्द करण्यात आल्याचे प्रसिद्ध केले होते. मॉडेल स्थानकात समावेश केल्यानंतर अाैरंगाबादच्या स्थानकाचे दुसऱ्या टप्प्यातील काम दहा वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटूनही होत नाही, याकडेही लक्ष वेधले हाेते.
लाेकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेवेळी खा.इम्तियाज म्हणाले, ‘मराठवाड्यातील रेल्वे प्रश्नांकडे दिव्य मराठीने वारंवार लक्ष वेधले. रेल्वे अर्थसंकल्पात दक्षिण मध्य रेल्वेला ६८९८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला, मात्र त्यापैकी नांदेड विभागात केवळ ९८ कोटी ७५ लाख २ हजार रुपये मिळाले. दक्षिण मध्य रेल्वेच्या बजेटपैकी ही रक्कम केवळ १.४५ टक्के अाहे. दाैलताबाद-चाळीसगाव हा केवळ ८८ किमीचा रेल्वेमार्गही रद्द करण्यात अाला. अाैरंगाबादजवळ ड्रायपोर्ट, डीएमआयसी, समृद्धी महामार्गासारखे प्रकल्प असल्याने येथून मालवाहतुकीसाठी फायदा आहे, तरीही या प्रकल्पांकडे रेल्वे अधिकारी लक्ष देत नाहीत. ११ वर्षे लढा देऊन मिळवलेल्या कोल्हापूर-धनबाद रेल्वेचाही मार्ग बदलण्यात अाला. ही गाडी हिंदू, बौद्ध व जैन समाजाच्या तीर्थक्षेत्रांसाठी महत्त्वाची हाेती. रेल्वेमंत्री गाेयल हे महाराष्ट्राचे असल्याने त्यांच्याकडून खूप अपेक्षा हाेत्या, मात्र त्यांनीही दुजाभावाची वागणूक दिली, असा अाराेप करतानाच रेल्वेमंत्र्यांनी अाता मराठवाड्याच्या सर्व खासदारांची मुंबईत एक बैठक बोलावण्याची मागणीही इम्तियाज यांनी केली.
आेमप्रकाश वर्मा यांचा गाैरवपूर्ण उल्लेख
मराठवाडा रेल्वे विकास समितीचे संस्थापक अाेमप्रकाश वर्मा यांनी अायुष्यभर या भागातील रेल्वे प्रश्न साेडवण्यासाठी प्रयत्न केले अाहेत. पदरचा खर्च करून वर्मा वर्षानुवर्षे अधिकारी, मंत्र्यांना भेटून प्रकल्प मार्गी लावण्यासाठी झगडत असतात. किमान अशा कार्यकर्त्याच्या सन्मानासाठी तरी रेल्वेमंत्र्यांनी मराठवाड्याला न्याय द्यावा, अशी अपेक्षा खासदार इम्तियाज यांनी व्यक्त केली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.