आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:वसमत येथील कुरेशी मोहल्ला भाग सील, आरोग्य विभागाच्या दहा पथकामार्फत सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात

हिंगोली9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वसमत येथील एका व्यक्तीचा नांदेड येथे कोरोनामुळे मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर गुरुवारी (ता. ११) आरोग्य विभागाने वसमत येथे जाऊन पाहणी केली. त्या ठिकाणी कुरेशी मोहल्लाचा काही भाग सील केला असून त्या ठिकाणी आरोग्य विभागाच्या दहा पथकामार्फत सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे.

वसमत येथील एका व्यक्तीला उपचारासाठी रविवारी ता. ७ नांदेड येथे दाखल करण्यात आले होते. त्यांचे स्वॅब नमुन्यांची तपासणी केली असता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांना उच्च रक्तदाब व मधुमेह असल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाच्या सुत्रांनी सांगितले. या प्रकाराची माहिती नांदेडच्या शासकिय रुग्णालयाने बुधवारी ता. १० रात्री हिंगोलीच्या आरोग्य विभागाला दिली. त्यावरून जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. किशोर श्रीवास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. गोपाल कदम यांच्या पथकाने रात्रीच वसमत येथे जाऊन पाहणी केली. त्यानंतर कुरेशी मोहल्ला परिसराचा काही भाग सील केला आहे. तर आज सकाळी आरोग्य विभागाची दहा पथके त्या ठिकाणी पाठविण्यात आले असून घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे.

या संदर्भात डॉ. पवार यांनी सांगितले की, सदर व्यक्ती वसमतच्या दोन दवाखान्यात तब्येत दाखविण्यासाठी गेला होता. त्यामुळे त्या भागातील दोन दवाखाने देखील सील करण्यात आले आहेत. त्या भागात सर्दी, तापीचे रुग्ण असतील तर त्यांचे तातडीने स्वॅब नमुने तपासणीसाठी घेतले जाणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...