आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवाई सर्वेक्षण:रडारद्वारे जालना-जळगाव रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण, 14ते 17 मेदरम्यान दररोज पन्नास किमीपर्यंत हवाई सर्वेक्षण

औरंगाबाद4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेल्वे मंत्रालयाच्या वतीने जालना-जळगाव रेल्वेमार्गाचा “फायनल लोकेशन सर्व्हे ‘ केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ८ फेब्रुवारी २०२२ रोजी मंजूर केला होता. जालना ते जळगाव जिल्ह्यातील लोकांच्या सोयीसाठी जालना-जळगाव १७४ किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग केला जाणार आहे. त्याच्या सर्व्हेचे काम (भौतिकदृष्ट्या) सुरूच आहे. त्यासोबतच आता हवाई सर्व्हेसाठी अकोला येथे शुक्रवारी विमान दाखल झाले असून या विमानाद्वारे रडार (लिडार) चा वापर करून हवाई सर्व्हे केला जाणार आहे. हे विमान एका दिवसाला ५० किलोमीटरचा सर्व्हे करणार आहे. यामुळे फायनल लोकेशन सर्व्हेला गती मिळेल, असे दानवे म्हणाले. १४ ते १७ मेदरम्यान हे हवाई सर्वेक्षण होणार आहे. या सर्व्हेसाठी साडेचार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. फायनल लोकेशन सर्व्हे झाल्यानंतर तो स्वीकृतीसाठी रेल्वे बोर्डाकडे जाईल. जालना-जळगाव रेल्वेमुळे मराठवाड्याच्या ग्रामीण भागातील औद्योगिक विकासासह शेती, व्यापार, दळणवळण, लघुउद्योग, पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.

राजूर गणपतीवरून जाणार मार्ग : जालन्याहून पिंपळगाव, पांगरी, राजूर, भोकरदन, सिल्लोड मार्गे गोळेगाव, अजिंठा, फर्दापूर, जळगाव असा ७० टक्के मार्ग जालना लोकसभा क्षेत्रातून जात आहे. याचा फायदा पुढे सुरत, गुजरात, राजस्थानच्या गाड्यांना आंध्र प्रदेश, दक्षिण भारताकडे जाण्यासाठी छोटा मार्ग म्हणून होणार आहे. लवकरात लवकर याचे काम पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...