आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक पुस्तक दिन:राघव, अक्षता, विधी ‘बुक इन अ बॉक्स’ चे विजेते; ‘बुक इन अ बॉक्स’स्पर्धेत ५० जणांनी नोंदवला सहभाग

औरंगाबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक पुस्तक दिनानिमित्त बुक वर्ल्ड लायब्ररीतर्फे सलग पाचव्या वर्षी विविध उपक्रमांद्वारे पुस्तक दिन साजरा केला. टीव्ही, मोबाइल, इंटरनेटच्या काळात मुलांमध्ये वाचन संस्कृती कायम ठेवण्यासाठी ग्रंथालयाचे जगभरात मोठे महत्व आहे. उल्कानगरीत ‘बुक इन अ बॉक्स’ स्पर्धेत राघव बोडखे, अक्षता नरवडे, वेदांत जोशी, लिरा जोशी, रीत बंब, विधी लढ्ढा, अर्जुन पठाडे यांनी आपापल्या गटात यश मिळवले.

या स्पर्धेत आपल्या आवडत्या पुस्तकाच्या संबंधित एक छोटा देखावा एका बॉक्समध्ये साकारायचा होता. लहान मुलांनी जुन्या बॉक्सेसना रिसायकल करून पर्यावरणाविषयी जागरूकता दाखवली. त्याचबरोबर सानवी कासट, ईशान मालपाणी, इधांत मालपाणी, श्लोक सोनी, क्रिशा भगेरिया, मधुरा कुलकर्णी आणि निऋती नलावडे यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली. रीमा बोडखे यांनी मुलांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले.

कार्यक्रमाचे आयोजन लायब्ररीच्या संस्थापिका संगीता गायके, संचालिका अंजली नलावडे यांनी केले होते. याप्रसंगी गीतांजली नरवडे, कल्पना पठाडे, डॉ. खुशबू कासट, डॉ. आरती मालपाणी, ॲड. आरती जोशी, सपना भगेरिया, सुषमा लड्डा आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...