आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधींची 'भारत जोडो यात्रा' महाराष्ट्रात धडकली!:कोण - कोणत्या शहरातून जाणार, प्रवासात सहभागी व्हायचे कसे? घ्या जाणून...

औरंगाबाद | सलमान राजू शेखएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' आज नांदेड शहरातून महाराष्ट्रात धडकणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा सुरू असून त्याचे स्वरूप नेमकं कसे आहे. तसेच महाराष्ट्रात ही यात्रा कुठे आणि किती दिवस असणार आहे, कोणकोणते महत्वाचे नेते या यात्रेत सहभागी होतील, तसेच सर्वसामान्यांना या यात्रेत सहभाग घ्यायचा असेल तर कसा सहभाग घेता येईल, हेच आपण आज जाणून घेणार आहोत...

भारत जोडो यात्रेचे स्वरूप कसे?

काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' ही देशातील 12 राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशातून जाणार आहे. त्यात तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा ही चार राज्ये या यात्रेची पूर्ण झाली आहेत. आता महाराष्ट्र या यात्रेचे पाचवे राज्य आहे. सात ते 20 नोव्हेंबर असे 14 दिवस ही यात्रा महाराष्ट्रात असणार आहे. त्यात नांदेड, हिंगोली, वाशिम, बुलडाणा, अकोला या जिल्ह्यातून 384 किलोमीटरचे अंतर ही यात्रा करणार आहे. महाराष्ट्रात या यात्रेचा पहिला दिवस सात नोव्हेंबर असणार आहे. या दिवशी यात्रा तेलंगणातून महाराष्ट्रात प्रवेश करत नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात पोहचणार आहे. त्यात नांदेड जिल्ह्यात 120 किमीचा हा प्रवास असेल.

दुसरा दिवस :

आठ नोव्हेंबर रोजी ही यात्रा देगलूर तालुक्यातून खतगावमार्गे बिलोली तालुक्यात पोहोचेल. पहिल्या दोन्ही दिवसांचा मार्ग हा देगलूर-बिलोली मतदार संघातून जाणार आहे.

तिसरा दिवस :

9 नोव्हेंबर रोजी ही यात्रा नायगाव विधानसभा मतदार संघात पोहोचेल.

चौथा दिवस :

10 नोव्हेंबर रोजी राहुल गांधींची नांदेडमध्ये नवा मोंढा येथे दुपारी साडेचार वाजता जाहीर सभा होणार आहे. महाराष्ट्रातली ही भारत जोडो यात्रेची पहिली सभा असणार आहे. त्यानंतर ही यात्रा नांदेड दक्षिण, उत्तर, लोह, कंधार या विधानसभा मतदारसंघात जाणार आहे.

पाचवा दिवस :

11 नोव्हेंबर रोजी भोकर, हदगाव या विधानसभा मतदारसंघातून भारत जोडो यात्रा अर्धापूर तालुका आणि त्यानंतर हदगावमध्ये पोहोचणार आहे.

सहावा दिवस :

12 नोव्हेंबर रोजी यात्रा नांदेड जिल्ह्यातून बाहेर पडत हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघात कव्हर करत हिंगोलीत प्रवेश करणार आहे.

सातवा दिवस :

सातव्या दिवशी म्हणजे 13 नोव्हेंबरला या यात्रेचा आराम दिवस असणार आहे.

आठवा दिवस :

14 नोव्हेंबर रोजी यात्रा कळमनुरी आणि हिंगोली विधानसभा मतदार संघात असणार आहे.

नववा दिवस :

नवव्या दिवशी ही यात्रा वाशीम जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.

दहावा दिवस:

16 नोव्हेंबर रोजी रिसोड विधानसभा मतदार संघात ही यात्रा असणार आहे.

11 वा दिवस :

वाशिम जिल्ह्यातून ही यात्रा अकराव्या दिवशी अकोला जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. यात दिवशी ही यात्रा शेगावमध्ये पोहोचणार आहे. त्याच दिवशी शेगावमध्ये राहुल गांधींची जाहीर सभा देखील होणार आहे. या सभेच्या नियोजनासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेकांवर जबाबदारी देण्यात आली आहे.

12 वा दिवस :

18 नोव्हेंबर रोजी ही यात्रा अकोल्यातील बाळापूर विधानसभा मतदारसंघ कव्हर करणार आहे.

13 वा दिवस :

19 नोव्हेंबर रोजी भारत जोडो यात्रा बुलडाणा जिल्ह्यात प्रवेश करेल. त्यात जळगाव, जामोद आणि खामगाव हे मतदार संघात देखील ही यात्रा फिरणार आहे.

14 वा दिवस :

20 नोव्हेंबर हा महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेचा शेवटचा दिवस असणार आहे. या दिवशीही जळगाव, जामोद या विधानसभा मतदार संघात ही यात्रा असणार आहे. त्यानंतर जळगावमार्गे ही यात्रा मध्यप्रदेशात प्रवेश करणार आहे.

कुठले नेते सहभागी होणार

भारत जोडो यात्रेच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, जयंत पाटील, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर असे महत्वाचे नेते या यात्रेत सहभागी होणार आहे.

सहभागी होण्यासाठी काय करावे

या यात्रेत सहभागी होण्यासाठी कुठलेही बंधन नाही. या यात्रेत सर्वसामान्यांना देखील सहभाग घेता येतो. सहभाग घेतल्यानंतर तुम्हाला अतिथी यात्री असे म्हटले जाईल. त्यासाठी तुम्हाला स्थानिक काँग्रेस कमिटीशी संपर्क साधावा लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...