आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधींचा उद्या औरंगाबादेत मुक्काम:सूरत प्रचार सभेसाठी गुजरातला जाणार; जयराम रमेश, कन्हैयाकुमारही सहभागी होणार

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसचे नेते राहुल गांधी सोमवारी औरंगाबादमध्ये असणार आहे. गुजरात निवडणुकीच्या प्रचारासाठी ते सुरतला जाणार आहे. भारत जोडो यात्रा सुरु असतांना राहुल गांधी प्रचाराला जाणार आहेत. त्यासाठी ते औरंगाबादच्या विमानतळावरुन हेलीकॉप्टरने सुरतला जाणार आहेत.त्यानंतर सुरतची सभा आटोपून ते औरंगाबादमध्ये मुक्कामी असणार आहेत. मुकुंदवाड़ी परिसरात त्यांचे स्वागत करण्यासाठी देखील सध्याकाळी साडेपाच वाजता कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष कल्याण काळे यांनी केले आहे.

याबाबत माहिती देतांना काळे यांनी सांगितले की जळगाव जामोद वरुन राहुल गांधी औरंगाबाद विमानतळावर दुपारी साडेबाराच्या सुमारास येणार आहे.इथून ते सुरतला प्रचारसभेसाठी जाणार आहेत.त्यानंतर संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान ते औरंगाबादमध्ये येणार आहेत. औरंगाबादमध्ये ते हॉटेल रामा इंटरनँशनलमध्ये मुक्कामी असणार आहेत.त्यानंतर मंगळवारी सकाळी सात वाजताच ते भारत जोडो यात्रेसाठी रवाना होणार आहेत.

याबाबत माहिती देतांना काळे यांनी सांगितले की जळगाव जामोद वरुन राहुल गांधी औरंगाबाद विमानतळावर दुपारी साडेबारा च्या सुमारास येणारआहे.इथून ते सुरतला प्रचारसभेसाठी जाणार आहेत.त्यानंतर संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान ते औरंगाबादमध्ये येणार आहेत.

जयराम रमेश यांचे केले स्वागत

रविवारी औरंगाबाद विमानतळावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते. जयराम रमेश, कन्हैया कुमार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ता अतुल लोंढे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष कल्याण काळे, औरंगाबाद शहर जिल्हा अध्यक्ष शेख युसूफ लीडर,भाऊसाहेब जगताप, गौरव जैस्वाल, डॉ.पवन डोंगरे, अनिस पटेल, कैसर बाबा, नानासाहेब धामणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...