आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसने भाजपला डिवचले:राहुल गांधींच्या ईडी चौकशी प्रकरणी शहर काँग्रेसची औरंगाबादेत भाजप विरोधात पोस्टरबाजी

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुल गांधी यांच्या वरील ईडी कारवाईच्या निषेधार्थ शहरभर काँग्रेस शहराध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी केंद्रातील मोदी सरकार विरोधात बॅनर लावले. ईडी तो बहाना है भाजपा सरकार को अपने घोटाले और नाकामी छुपाना है. या आशयाचे बॅनर 19 जून रोजी शहरभर लावण्यात आले.

काँग्रेस पक्षाचे नेते व खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सक्तवसुली संचालनालय (ईडी) ने केलेली चौकशीच्या निषेधार्थ शहरात 17 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर रविवार 19 जून रोजी काँग्रेसचे शहराध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात शहरभर बॅनर लावत केंद्रातील भाजप सरकारचा निषेध केला. बॅनरवर केंद्र सरकारच्या 11 निर्णयावर काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित करत त्या निर्णयाविरोधात भूमिका घेतली होती. त्यामुळे केंद्रातील भाजप सरकारने राजकीय सूडबुद्धीने डीडी ची कारवाई केली आहे. त्याच्या निषेधार्थ शहरभर काँग्रेस शहराध्यक्ष यांनी बॅनर लावले. बॅनर वर भाजप सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच बॅनरवर बेरोजगारी, देशातील घसरती अर्थव्यवस्था, वाढती महागाई, कोरोना महामारी हाताळताना केंद्र सरकारला आलेले वैफल्य, राफेल घोटाळा, नोटबंदी, जीएसटी टॅक्स, पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ, विफल राष्ट्रीय सुरक्षा नीती मुळे शेजारी राष्ट्राचे अतिक्रमण, सर्व धर्म समभाव बिघडवणारे सीएए, एनआरसी सारखे कायदे, शेतकरी विरोधातील तीन काळे कायदे आदी विषयांवर राहुल गांधी यांनी सरकार विरोधात भूमिका घेतली होती. व सरकार विरोधात भूमिका घेतली होती. म्हणूनच केंद्रातील भाजप सरकारने राहुल गांधी यांच्यावर राजकीय सूड बुद्धीतून ईडी कारवाई केली. त्यामुळे केंद्र सरकारचा निषेध अशा आशयाचे बॅनर शहरभर काँग्रेस शहराध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी शहरभर लावले.

बातम्या आणखी आहेत...