आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘भारत जोडो’ यात्रेतून आलेल्यांचा दावा:राहुल गांधींचा आदेश, माझ्यासारखे तुम्हीही खेड्यात जाऊन लोकांच्या समस्या जाणून घ्या

औरंगाबाद / प्रवीण ब्रह्मपूरकर7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेमध्ये नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांत प्रवास केला. या यात्रेमुळे काँग्रेसमध्ये आलेली मरगळ दूर झाल्याचे मत यात्रेत सहभागी झालेल्या नेत्यांनी व्यक्त केले. काँग्रेसचे पुढे काय आणि काँग्रेसमधल्या युवकांचे भवितव्य काय हा प्रश्नचिन्हदेखील आता कायमचा मिटून गेला आहे, असा दावा त्यांनी केला. राहुल गांधी यांनी आम्हाला त्यांच्यासारखे खेड्यात जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेण्याचे आदेश दिले आहेत, असेही त्यांनी सांगितले. यातील काही पदाधिकाऱ्यांनी सांगितले ते असे.

पक्षातील मरगळ दूर झाली काँग्रेसने युवकांसाठी टॅलेंट सर्च स्पर्धा घेतली होती. त्या वेळी माझी राहुल गांधींसोबत भेट झाली होती. महाराष्ट्रातून राजीव सातव, मी आणि एक जण अशा तिघांची निवड झाली होती. राहुल यांना भेटताना मी त्याची आठवण करून दिली. तेव्हा हो आपली भेट झाली होती, असे म्हणालेे. या यात्रेमुळे पक्षातील मरगळ दूर झाली. - जितेंद्र देहाडे, प्रदेश सरचिटणीस

आम्हालाही भवितव्य आहे या यात्रेमुळे काँग्रेसचे काय होणार आणि आमच्यासारख्या युवा कार्यकर्त्यांचे भवितव्य काय असणार या दोन प्रश्नांचे आमच्यासमोर असलेले प्रश्नचिन्ह कायमस्वरूपी मिटून गेले आहेत. - मोहित जाधव, अध्यक्ष, एनएसयूआय

अशोक चव्हाणांविषयीचा संभ्रम दूर मी यापूर्वी अनेक वेळा राहुल गांधी यांना भेटलो आहे. मात्र या वेळी अनुभवलेले राहुल हे खूप परिपक्व झाले असल्याचे जाणवले. या यात्रेमुळे अशोक चव्हाण यांच्याबद्दल भाजपने निर्माण केलेला संभ्रम दूर झाला. - अमर राजूरकर, आमदार.

सकाळी ६ वाजता १५ हजार लोक आले २०१३ मध्ये मी आमदार असताना काँग्रेसच्या वतीने राज्यातून चार आमदारांना दिल्लीत बोलावले होते. त्या वेळी राहुल गांधी यांना भेटलो होतो. हिंगोलीत आल्यानंतर पदयात्रेत चालताना त्यांना या प्रसंगाची आठवण करून दिली. त्यानंतर त्यांनी हिंगोलीबाबत चर्चा केली. राहुल सकाळी सहा वाजता यात्रा सुरू करतील आणि पावणेसातला आपल्या मतदारसंघाच्या बाहेर जातील, असे सांगितल्यानंतर सकाळी साडेपाचपर्यंत पंधरा हजार लोक त्यांना भेटण्यासाठी आले होते. - भाऊसाहेब पाटील गोरेगावकर, माजी आमदार, हिंगोली

बातम्या आणखी आहेत...