आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधींचा आज औरंगाबादेत मुक्काम:गुजरातमध्ये सभा झाल्यानंतर आगमन, मंगळवारी भारत जोडो यात्रेसाठी रवाना होणार

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सोमवारी गुजरातमध्ये सभा होत असून रात्री ते औरंगाबादमध्ये मुक्कामी असणार आहेत. दुपारी साडेबारा वाजता जळगाव जामोद येथून हेलिकॉप्टरने ते औरंगाबादला येतील. त्यानंतर चार्टर्ड विमानाने ते औरंगाबाद विमानतळावरून सुरतला रवाना होत आहेत. सुरत व राजकोट जिल्ह्यातील दोन सभांनंतर ते संध्याकाळी साडेपाच वाजता औरंगाबादला परतणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कल्याण काळे यांनी दिली.

काळे यांनी सांगितले की, सुरत येथून आल्यानंतर राहुल गांधी विमानतळावरून थेट मुक्कामासाठी हॉटेल रामा इंटरनॅशनल इथे जाणार आहेत. संध्याकाळी साडेपाच वाजता मुकुंदवाडी बसस्टॉपजवळ त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शहराध्यक्ष युसूफ शेख आणि जिल्हाध्यक्ष काळे यांच्या वतीने करण्यात आले आहे. हॉटेलवर मात्र त्यांच्या भेटीगाठीसंबंधी कोणतेही नियोजन असणार नाही. दरम्यान, भारत जोडो यात्रा सध्या बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात निमखेडी येथे दोन दिवस मुक्कामी असून राहुल गांधी परतल्यानंतर ती पुढे मार्गस्थ होईल.

राहुल यांचा दाैरा याप्रमाणे {आज दुपारी १२.३० वाजता औरंगाबादला आगमन होईल. {दुपारी ०१.०० वाजता अनावल, सुरत येथील सभेसाठी रवाना {दुपारी ३ च्या सुमारास राजकाेट भागात जाहीर सभा हाेईल. {सायंकाळी ६ पर्यंत औरंगाबाद विमानतळावर होईल आगमन. {रात्री रामा इंटरनॅशनलमध्ये ते मुक्कामी असतील. {मंगळवारी सकाळी ७ वाजता भारत जोडो यात्रेसाठी रवाना.

बातम्या आणखी आहेत...