आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धापूर्व प्रशिक्षण:राहुल, ऋतुराजची नॅशनल गेम्ससाठी राज्य संघात निवड

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरात येथे ३६ व्या नॅशनल गेम्सचे आयाेजन करण्यात आले आहे. या गेम्समधील सॉफ्ट टेनिस स्पर्धेसाठी औरंगाबादच्या राहुल उगलमुगले व ऋतुराज स्वर्णकार यांची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. ही स्पर्धा ७ ते १२ ऑक्टोबरदरम्यान अहमदाबाद येथे पार पडेल. संघाचे स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिर शिवछत्रपती क्रीडानगरी बालेवाडी, पुणे येथे सुरू आहे. पुण्यावरून संघ स्पर्धेसाठी रवाना होईल. या दोघांना प्रशिक्षक नीलेश हारदे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या निवडीबद्दल सॉफ्ट टेनिस असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष सुनील पूर्णपात्रे, सचिव रवींद्र सोनवणे, एमओएचे सचिव नामदेव शिरगावकर, माजी उपहापौर प्रमोद राठोड यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

बातम्या आणखी आहेत...