आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनैतिक व्यापार प्रतिबंधक पथकाची कारवाई:म्हैसमाळ येथे कुंटणखान्यावर‎ छापा, पोलिसांकडून महिलेसह तिघांना अटक‎

खुलताबाद‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील म्हैसमाळ येथे एका हॉटेलवर बऱ्याच‎ दिवसांपासून कुंटणखाना सुरू असल्याची माहिती गुप्त‎ बातमीदारामार्फत मिळताच अनैतिक व्यापार प्रतिबंधक‎ पथकाने कारवाई करत कुंटणखान्यामधून ३ आरोपींसह‎ १३ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

एक‎ महिला, अप्पासाहेब साठे, महेश बालेराव असे आरोपींचे‎ नाव अाहे. ३० वर्षीय पीडित महिलेला समज देऊन‎ साेडून दिले.‎ पोलिसांनी सांगितले की, म्हैसमाळ येथील सचानंद‎ हॉटेलवर कुंटणखाना सुरू असल्याची माहिती मिळत‎ होती. अनैतिक व्यापार प्रतिबंधक पथकाने एक बनावट‎ ग्राहक हॉटेलवर पाठवला होता.

त्या ठिकाणी देहव्यापार‎ करून घेणाऱ्या महिलांशी त्याचे बोलणे झाले. तिथे एका‎ महिलेला पैसे घेऊन एका खोलीत जात असतानाच‎ पथकाने अनैतिक पथक व खुलताबाद पोलिसांनी धाड‎ टाकत देहव्यापार करणाऱ्यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्या‎ ताब्यातून २ मोबाइल, रोख रक्कम व १३ निराेधचे पाकीट‎ हस्तगत केले. पोलिस निरीक्षक भुजंग हातमोडे यांच्या‎ उपस्थित पंचनामा करून पीडितेसह आरोपींना‎ खुलताबाद पोलिस ठाण्यात आणले व गुन्हा दाखल‎ करण्यात आला.

ही कारवाई अधीक्षक मनीष‎ कलवानिया यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस‎ अधीक्षक सुनील लांजेवार, उपविभागीय पोलिस‎ अधिकारी मुकुंद आघाव यांच्या सूचनेसार सहायक‎ पोलिस निरीक्षक आरती जाधव व पोलिस निरीक्षक‎ भुजंग हातमोडे यांनी केली आहे.‎