आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीड बायपास येथील एका वाइन शॉपच्या वरच्या मजल्यावर सुरू असलेल्या पत्त्याच्या क्लबवर सातारा पोलिसांनी छापा मारून २३ जणांना अटक करून १ लाख ७३ हजार रुपये जप्त केले. या वेळी काँग्रेसचे सादातनगरचे माजी नगरसेवक मोहंमद नावेद अब्दुल रशीद हे डाव खेळताना आढळून आले. उत्तम खंडुजी कांबळे (४५, रा. उत्तमनगर) आणि मनिराम उदयराम चव्हाण (५९, रा. न्यू हनुमाननगर) हे क्लब चालवत होते. हे दोघे शहरातील काही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या संपर्कात असतात. त्यामुळेच क्लब खुलेआम सुरू होता, अशी चर्चा आहे.
साताऱ्याचे उपनिरीक्षक देविदास शेवाळे यांना खबऱ्याने जबिंदा मैदानाजवळील लक्की वाइन शॉपवरील मजल्यावर आलिशान पत्त्याचा क्लब सुरू झाल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी कारवाईच्या सूचना केल्या. पथकासह शेवाळे यांनी बुधवारी सात वाजता छापा टाकला असता काउंटरवर उत्तम कांबळे व मनिराम बसलेले होते. त्यांना बाजूला करत हॉलमध्ये प्रवेश करताच २३ जण पत्ते खेळत होते. त्यांच्याकडून १ लाख ७३ हजार ९१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत सर्वांना अटक करण्यात आली. शेवाळे, अंमलदार कारभारी नलावडे, अरविंद चव्हाण, मनोज अकोले, सुनील धुळे, युवराज क्षीरसागर यांनी ही कारवाई केली.
हे आहेत आरोपी : शेख रफिक (५२, रा. सादातनगर), अब्दुल साजेद (२६), जावेद खान (३४), शेख अमजद (४०), मोहंमद नावेद (३५, सर्व रा. सादातनगर), धनंजय इंगळे (४२), दत्तू इंगोले (३५, दोघेही रा. गारखेडा), अनिस शेख (४३, रा. जहागीरदार कॉलनी), शेख फिरोज (४२, रा. उस्मानपुरा), अमोल केंद्रे (३१, रा. एकनाथनगर), सुजित दत्ता हनुवते (३८, रा. राजनगर), कमलेश मंडोरे (४२, रा. विजयनगर), दिनेश जाधव (३२), बाळासाहेब दादाराव दाभाडे (४७, दोघेही रा. जवाहर कॉलनी), अतुल नामदेव कोळी (३०, रा. पुंडलिकनगर), मोहंमद नूर खान (३१, रा. राहुलनगर), विकास गिरधर राठोड (३२, रा. देवळाई), शेख मेहमूद (३७, रा. देवळाई तांडा), अर्जुन गोवर्धन राजपूत (२२), जावेद समद पठाण (३६, दोघेही रा. चितेगाव), मच्छिंद्र संपत बनकर (३६, रा. अरिहंतनगर) यांना अटक करण्यात आली.
दर्शनी भागात लावला संस्थेचा बोर्ड
उत्तम कांबळे हा शहरातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चांगल्या संपर्कात होता. त्याच जोरावर त्याने इतर पोलिस अधिकाऱ्यांना वरचढ ठरण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, पोलिसांना संशय येऊ नये म्हणून क्लबच्या हॉलच्या दर्शनी भागावर शासनमान्य बाबासाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, सातारा परिसर शाखा असा बोर्ड लावला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.