आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निराशा:परभणी-मनमाड दुहेरीकरणाचे काम रेल्वे बोर्डाकडून स्थगित, मराठवाडा आणि संबंधित सात मार्गांच्या कामालाही स्थगिती

औरंगाबाद / सतीश वैराळकर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ओमप्रकाश वर्मा यांच्या माहिती अधिकारातून पितळ झाले उघडे

मराठवाड्यातील जनतेला मोठ्या संघर्षातून मनमाड ते नांदेड ब्रॉडगेज मार्ग मिळाला. रेल्वेने एकीकडे मुदखेड ते परभणी मार्गाच्या दुहेरीकरणाची प्रक्रिया सुरू केली आहे. दुसरीकडे परभणी ते मनमाड मार्गाच्या दुहेरीकरणाची प्रक्रिया स्थगित केली आहे. मराठवाडा रेल्वे विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश मोतीलाल वर्मा यांनी माहिती अधिकारात विचारलेल्या पत्रात रेल्वे बोर्डाचे पितळ उघडे पडले आहे. यासह मराठवाडा आणि संबंधित सात मार्गांच्या कामालाही स्थगिती देण्यात आली आहे. शून्य नफा असलेल्या मार्गांच्या दुहेरीकरणास एकीकडे रेल्वे मान्यता प्रदान करते, तर अडीच टक्के नफा दर्शवणारा परभणी-मनमाड मार्ग दुहेरीकरणापासून स्थगित केला आहे.

मध्य रेल्वे मुंबई यांना ओमप्रकाश वर्मा यांनी ३० नोव्हेंबर २०२० रोजी माहिती अधिकारात विविध प्रकल्पांच्या स्थितीसंबंधी माहिती विचारली होती. मध्य रेल्वेने २० जानेवारी २०२१ रोजी माहिती दिली आहे. परभणी-मनमाड दुहेरीकरणास २०१३-२०१४ मध्ये ब्ल्यू बुकमध्ये उल्लेख करण्यात आला होता. यासंबंधी रेल्वे बोर्डास अहवाल सादर करण्यात आला असून २१९९.३९ कोटी रुपये खर्च व २.१२ टक्के नफा ८ डिसेंबर २०१७ रोजी २९१ किमी मार्गासाठी दाखवण्यात आला होता. संबंधित प्रकल्पास रेल्वे बोर्डाने २२ फेब्रुवारी २०१८ रोजी स्थगिती दिल्याचे सांगण्यात आले. वाशीम-माहूर-आदिलाबाद हा १८९ किमी महाराष्ट्र व तेलंगण राज्यासाठीचा ३२३४.३२ कोटींचा प्रकल्प ८ डिसेंबर २०१७ रोजी -०.४८ % तोटा असल्याने स्थगित केल्याचे स्पष्ट केलेे आहे. लातूर रोड नांदेड हा १५५ किमीचा रेल्वेमार्ग मध्यकडून दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबादकडे हस्तांतरित करण्यात आला होता. या मार्गावर २०५२ कोटी खर्च अपेक्षित होता आणि प्रकल्प ६.७० % तोट्यात असल्याने रेल्वे बोर्डाने २५ ऑक्टोबर २०१८ रोजी स्थगित केला.

यासंबंधीचा अहवाल १६ मार्च २०१८ रोजी दाखल केला होता. मानवत रोड-परळी वैजनाथ मार्गे सोनपेठ हा ६७ किमी मार्ग ९.७४ टक्के तोट्यात असल्याचे ११ ऑक्टोबर २०२८ च्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आणि २९ नोव्हेंबर २०१८ रोजी स्थगित केल्याचे बोर्डाने कळवले. किनवट माहूर या ४५ किमी मार्गावर २१०.४६ कोटी खर्च अपेक्षित होता. मार्ग १२.५२ % तोट्यात असल्याचा अहवाल १६ एप्रिल २०१० रोजी प्राप्त झाल्याने ६ ऑक्टोबर २०१० मध्येच यास स्थगिती देण्यात आली. औरंगाबाद-दाैलताबाद-कन्नड-चाळीसगाव हा ८८ किमी लांबीचा मार्ग एप्रिल २०१८ मध्ये स्थगित केला. रोटेगाव-कोपरगावच्या सर्वेक्षणास २०१७-१८ मध्ये मान्यता प्रदान करण्यात आली असून, सर्व्हेचे काम प्रगतिपथावर आहे. जालना-खामगाव या शंभर वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मार्गाच्या सर्वेक्षणास १६ फेब्रुवारी २०१९ रोजी मान्यता दिली आहे.

मराठवाडा आणि संबंधित सात मार्गांच्या कामालाही स्थगिती
परळी-नगर अर्धवट
परळी-बीड-नगरमार्गे नगर ते नारायणडोहपर्यंत १२ किमी मार्च २०१७ मध्ये पूर्ण झाला. नारायणडोह-सोलापूरवाडी २५ किमी फेब्रुवारी २०१९ पर्यंत पूर्ण केला. परळी ते सोलापूरवाडी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू आहे. एकूण मार्ग २६२ किमी इतका आहे.

वर्धा-यवतमाळ
संबंधित मार्गाचा पहिला टप्पा वर्दा यवतमाळ ७८ किमीचा आहे. संबंधित मार्गात ३ किमी मार्गाची जमीन अधिग्रहण प्रक्रिया शिल्लक आहे. दुसरा टप्पा यवतमाळ ते नांदेड २०६ किमीचा असून प्रक्रिया प्रगतिपथावर आहे. मनमाड-मालेगाव-इंदूर मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल १४ जुलै २०१७ रोजी सादर करण्यात आलेला आहे.