आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुट्यांचा परिणाम:जूनपर्यंत रेल्वे आरक्षण फुल्ल; मुंबई, दिल्ली, हैदराबाद, तिरुपतीसाठी नागरिकांची पसंती

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनानंतर रेल्वे प्रवासावर पुन्हा एकदा प्रवाशांची झुंबड उडाल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे दोन वर्षे घरात बसलेल्या नागरिकांनी आता पर्यटनासाठी बाहेर पडण्यास सुरुवात केली आहे. औरंगाबादेतून चार महत्त्वाच्या रेल्वे वगळता इतर सर्व गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. मुंबई, नवी दिल्ली, अमृतसर, काकीनाडा, सिकंदराबाद, हैदराबाद, तिरुपती, रामेश्वर, ओखा, जयपूर, अजमेर आदी ठिकाणी जाण्यासाठी प्रवासी पसंती देत आहेत.

त्यामुळे औरंगाबादहून मुंबई, दिल्ली, हैदराबाद, तिरुपतीकडे जाणाऱ्या रेल्वेंचे वातानुकूलित आरक्षण जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत फुल्ल झाले आहे. पुणेसाठी रेल्वेऐवजी औरंगाबादकर खासगी बस आणि राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर अवलंबून आहेत. खासगी बसच्या तुलनेत रेल्वेचे तिकीट अधिक स्वस्त असल्यामुळे रेल्वेला प्रथम प्राधान्य दिले जात आहे. जालना-मुंबईसाठी जनशताब्दी एक्स्प्रेसचे आरक्षण मात्र दहा दिवस पुढचे मिळत आहेत. संबंधित रेल्वे गैरसोयीची असल्यामुळे या रेल्वेचे सहज आरक्षण मिळत असल्याचे प्रवासी व खासगी बस ऑपरेटरचे म्हणणे आहे.

औरंगाबादहून लोकमान्य टिळक टर्मिनस अंजनी एक्स्प्रेस, नगरसोल चेन्नई, एलटीटी कागजनगर ताडोबा एक्स्प्रेस पूर्णत: बंद आहेत. मुंबई-नागपूर नंदीग्राम एक्स्प्रेस केवळ आदिलाबादपर्यंत धावते. औरंगाबादहून मुंबईला जाण्यासाठी पाच, तर हैदराबादसाठीही पाच रेल्वे आहेत. खासगी बसेसच्या तुलनेत रेल्वेचे स्लीपर क्लासचे तिकीट स्वस्त असल्यामुळे नागरिक रेल्वे प्रवासाला प्रथम पसंती देत आहेत.

औरंगाबादहून प्रवासी बुकिंग वाढली : आता औरंगाबादेतून तिकीट काढणारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. प्रतिदिन १,३०० प्रवासी आरक्षण राखीव करत आहेत. तर खिडकीवरून सातशेवर प्रवासी तिकीट काढत आहेत. रेल्वने विद्यार्थी, विकलांगसह विविध आजारांच्या रुग्णांच्या सवलती सुरू केल्या आहेत. वरिष्ठ नागरिक, महिला, पत्रकारांसह दहा सवलती अद्याप सुरू केल्या नाहीत. रेल्वेस्थानकाहून महिन्याला पाच कोटींवर आरक्षण आणि तिकीट खिडकीवर प्राप्त होतात. मार्च २०२१ ते फेब्रुवारी २०२२ मध्ये औरंगाबाद रेल्वेस्थानकाचे उत्पन्न ५२ कोटी १५ लाख असून सिकंदराबाद झोनमध्ये औरंगाबाद स्थानक नवव्या क्रमांकावर आहे.

बातम्या आणखी आहेत...