आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद दक्षिण मध्य रेल्वे यांनी औरंगाबाद येथे नांदेड विभागातील वाणिज्य अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी यूटीएस मोबाइल तिकीट अॅपच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी एक चर्चासत्र गुरुवार (१५ डिसेंबर ) रोजी आयोजित केले होते. रेल्वे स्थानकांपासून २० किलोमीटर अंतरावरून, अगदी घरातूनही अनारक्षित रेल्वे तिकीट खरेदी करू शकता, रांगेत न थांबता काही सेकंदातच मोबाईलवरून अनारक्षित तिकीट खरेदी करू शकता.
या चर्चासत्रात नागेंद्र प्रसाद, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, नांदेड, रवी तेजा, वाणिज्य व्यवस्थापक, नांदेड, आर. मोजेस, सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक, तसेच नांदेड विभागातील वाणिज्य निरीक्षक, तिकीट तपासणीस, आरक्षण पर्यवेक्षक, बुकिंग पर्यवेक्षक आदी संवर्गातील वाणिज्य कर्मचारी उपस्थित होते.
के. सांबशिव राव, मुख्य वाणिज्य व्यवस्थापक (पॅसेंजर मार्केटिंग) यांनी प्रवाशांमध्ये यू टी आई मोबाईल अॅपचा अवलंब वाढवणे आणि प्रमुख स्थानकांवर उपलब्ध ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशीन्स चा वापर वाढवण्यासाठी उचलल्या जाणाऱ्या पावलांवर तपशीलवार पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन दिले. तिकीट करताना डिजिटल पेमेंटचा वाटा वाढवण्याच्या गरजेवर भर दिला.
यूटीएसचा अवलंब करून डिजिटल आणि कॅशलेस व्यवहार वाढवल्याने कर्मचाऱ्यांवरील कामाचा भार आणि स्टेशनरी छपाईवरील ताण कमी होतो, असेही ते म्हणाले. त्यांनी विभागीय कर्मचार्यांना आवाहन केले की त्यांनी वर्षअखेरीस तिकिटात यू टी आई अॅपचा हिस्सा २०% पर्यंत वाढवावा आणि यू पी आई द्वारे कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन द्यावे.
खरेदी केलेले तिकीट तपासनिकास मोबाईल वर दाखविता येईल.सीजन तिकीट १० दिवसा पूर्वी नूतनीकरण करू शकता , तिकीट खिडकीवर दिलेले क्यू आर कोड स्कॅन करून सुधा तिकीट खरेदी करता येते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.